JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Ketaki Chitale: "चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही" केतकी चितळेच्या FB पोस्ट नंतर राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका

Ketaki Chitale: "चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही" केतकी चितळेच्या FB पोस्ट नंतर राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. कळव्यानंतर आता पुण्यातही केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जाहिरात

"चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही" केतकीच्या वादग्रस्त FB पोस्ट नंतर राष्ट्रवादी आक्रमक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 14 मे : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर (Ketaki Chitale controversial Facebook Post) तिच्या विरोधात कळव्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) केतकी चितळेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी केतकीला चोप देण्याचीच भाषा केली आहे. केतकी चितळेला चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी घेतली आहे. केतकी चितळे मानसिक आणि गंजाडी अभिनेत्री आहे, अशा शब्दात पाटलांनी संताप व्यक्त केला आहे. केतकीवर गुन्हे जरी दाखल झाले तरी तिला चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही… आणि तिचा मोबाइल नंबर आम्ही फेसबूकवर शेअर करणार असल्याचा इशाराही दिला आहे. दुसरीकडे केतकी चितळेचे आई वडील तिला संस्कार देण्यात कमी पडले असावे असा वाटतं. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच काम असे मनोरुग्ण करतायत असंही रुपाली पाटील यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे केतकी चितळेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शहर काँग्रेसने केतकी चितळे हिच्या विरोधात सायबर क्राईमकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. तपास क्राईम ब्राँचकडे केतकी चितळे विरोधात कळव्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्राँच करणार आहे. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्राँचने हाती घेतला आहे. केतकी कुठे आहे याचा शोध लागत नसल्याने, तिला शोधण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 1 ची टीम तयार असल्याची माहिती समोर येत आहे. वाचा :  केतकी चितळेची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Facebook पोस्ट, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काय आहे प्रकरण? केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या