JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / शिंदेंचा दोन्ही ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; शिवसेना-मनसेचं डॅमेज कंट्रोलही पाण्यात!

शिंदेंचा दोन्ही ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; शिवसेना-मनसेचं डॅमेज कंट्रोलही पाण्यात!

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दोनही ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह राज ठाकरेंच्या मनसेत चांगलीच अस्वस्था पसरली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 28 डिसेंबर : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दोनही ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह राज ठाकरेंच्या मनसेत चांगलीच अस्वस्था पसरली आहे. ही पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून राउतांना तर राज ठाकरेंकडून पुत्र अमित ठाकरे यांना डॅमेज कंट्रोल साठी धाडले मात्र त्याचाही फारसा काही उपयोग झाला नाही, त्यामुळे शिंदेंची शिवसेना दोन्ही ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. महानगरपालिकेत सत्ता, अर्धा डझनहून अधिक, आमदार, खासदार, मंत्री अशी सगळी ताकत नाशिकमध्ये शिवसेनेची होती. एकेकाळी शिवसेनेसह मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने सुरुंग लावला, त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या सेनेत चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेतील असंख्य नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत असल्याने शिंदेसेना दोनही ठाकरेंना भारी पडत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडूनही येणाऱ्यांचं जोरदार स्वागत केले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडून दोनही ठाकरेंच्या सेनेला सुरुंग लावण्यात आल्या नंतर या बालेकिल्ल्याची पडझड रोखण्यासाठी मनसेकडून राजपुत्र अमित ठाकरे यांना तर ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत यांना धाडण्यात आलं, पण दोन्ही सेनापतींना ही पडझड रोखण्यात अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे. राऊतांची पाठ फिरताच त्यांचे खंदे समर्थक भाऊ चौधरी हे शिंदे गटात दाखल झाले तर दुसरीकडे राजपूत्र आम्ही ठाकरे नाशिकमध्ये असताना त्यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. दोन्ही पक्षांकडून शिंदेसेनेच्या फोडाफोडी वर नाराजी व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीत या फोडाफोडीची परतफेड करण्याचं प्रतीआव्हान शिंदे सेनेला केल आहे. नाशिक हा दोनही ठाकरेंचा एकेकाळचा बालेकिल्ला मनसेला 3 आमदार 40 नगरसेवक अशी एकहाती सत्ता, तर उद्धव ठाकरेंच्या सेनेला महापालिकेत सत्ता, आमदार, खासदार असं मोठं बळ याच नाशिकने दिलं होतं, मात्र आता या दोन्ही सेनेच्या बालेकिल्ल्यातील असंख्य नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल होत आहेत, त्यामुळे दोन्ही ठाकरेंसमोर शिंदेंसेनेचं मोठ आव्हान उभं राहिल आहे. येणाऱ्या काळात शिंदे सेनेच हे आव्हान दोन्ही ठाकरे कसं परतवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या