JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / ...तर हैदराबाद प्रकरणात ना बलात्कार झाला असता ना हत्या, पोलिसांची धक्कादायक माहिती

...तर हैदराबाद प्रकरणात ना बलात्कार झाला असता ना हत्या, पोलिसांची धक्कादायक माहिती

या घटनेतील मुख्य आरोपी मोहम्मद आरिफ मागच्या दोन वर्षांपासून विना परवाना ट्रक चालवत होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 02 डिसेंबर : हैदराबादमध्ये झालेल्या सामूबहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. यात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मोहम्मद आरिफ मागच्या दोन वर्षांपासून विना परवाना ट्रक चालवत होता. सगळ्यात खळबळजनक म्हणजे बलात्काराची ही घटना घडण्याच्या 2 दिवस आधी मोहम्मद आरिफला पोलिसांनी चेकिंग वेळी ताब्यात घेतलं होतं. विना परवाना चालवत होता ट्रक मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपी आरिफ एक ट्रक डायव्हर आहे. तो 26 वर्षांचा आहे. रिमांड रिपोर्टनुसार, आरिफला तेलंगाना रोड ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने 24 नोव्हेंबरला महबूब नगर परिसरात वाहन चेकिंहवेळी ताब्यात घेतलं होतं. आरिफकडे गाडी चालवण्याचे कोणतेही परवाने नव्हते. त्यानंतर हाच ट्रक महिला डॉक्टरचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आला. इतर बातम्या - पंकजा मुंडे शिवसेनेते प्रवेश करणार का? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया घटनेच्या 2 दिवस आधी पोलिसांच्या तावडीतून पळाला मुख्य आरोपी 2017पासून आरोपी आरिफ विना परवाना ट्रक चालवत होता. घटनेच्या दोन दिवस आधी आरिफच्या ट्रकमध्ये विटा भरल्या होत्या. हा ट्रक RTOच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि हैदराबादच्या मधे महबूबनगर परिसरात पकडला. पण त्यानंतर ट्रकला सोडून देण्यात आलं. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. जर हा ट्रक सोडलाच नसता आणि आरिफवर कारवाई केली असती तर बलात्काराची ही मन हेलावणारी घटना घडली नसती असं पोलिसांनी म्हटलं आहे. इतर बातम्या - रोहित पवारांचं एक असंही रूप, फेसबुक पोस्टने केलं सगळ्यांना भावूक… मालकाच्या इशाऱ्यावर रचला कट परिवहन अधिकाऱ्यांना सुरुवातीला ट्रक ताब्यात घ्यायचा होता, परंतु नंतर आरिफने त्याच्या मालकाला श्रीनिवास रेड्डीला फोन केला. रेड्डीच्या सांगण्यावरून आरिफने ट्रकच्या इंजिनमधून तारा काढून टाकल्या. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, ट्रकमध्ये खराबी आहे. त्यामुळे ट्रक घेऊन जाणं अधिकाऱ्यांना शक्य झालं नाही म्हणून त्यांनी आरिफला जाऊन दिलं. मोठी बातमी - देवेंद्र फडणवीसांना धक्का, आणखी एका आमदाराने सोडली साथ अधिकारी तेथून निघून गेल्यानंतर आरिफने ट्रकला महबूबनगरमधील पेट्रोल पंपावर नेले आणि तेथे त्याने सामूहिक बलात्कारात सामील झालेल्या आरोपी मित्र नवीन कुमार आणि चेन्ना केशवल्लू यांना बोलावलं. या सगळ्या माहितीवरून आता पोलिसांनी शमसाबाद येथे राहणाऱ्या ट्रक मालक रेड्डीविरूद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या