JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / माजी राज्यमंत्री संजय देशमुखांचा शिवसेनेत प्रवेश, संजय राठोडांना शह देण्यासाठी ठाकरेंचा नवा डाव

माजी राज्यमंत्री संजय देशमुखांचा शिवसेनेत प्रवेश, संजय राठोडांना शह देण्यासाठी ठाकरेंचा नवा डाव

माजी मंत्री संजय देशमुख यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं आहे.

जाहिरात

संजय देशमुख - उद्धव ठाकरे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 20 ऑक्टोबर : माजी मंत्री संजय देशमुख यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरें च्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे, संजय राठोडांसमोर आता शिवसेनेनं आव्हान उभं केलं आहे.

संजय देशमुख हे माजी शिवसैनिकही आहेत. ते यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून 1999 आणि 2004 अशा सलग दोन टर्ममध्ये अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले. शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांचे ते प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या निवडणुकीत देशमुख यांनी संजय राठोड यांच्याविरोधात अपक्ष लढूनही 73 हजार मते मिळवली होती. त्य़ामुळे संजय राठोडांना शह देण्यासाठी ठाकरे गटाची ताकद आता वाढली आहे. Ashish Shelar BJP : उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी म्हणजे हा एक उठाव, आशिष शेलारांच्या वक्तव्याने खळबळ देशमुख हे मुळात शिवसैनिक होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्षात काम केलेलं आहे. 1999 मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ख्वाजा बेग यांचा केवळ 125 मतांनी पराभव करत आमदार झाले. त्याचवेळी देशमुख विलासराव देशमुख यांच्या सरकारला पाठिंबा देऊन राज्यमंत्री झाले. 2004 मध्येही ते अपक्ष म्हणूनही निवडून आले होते. 2009 मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून राठोड विजयी झाल्यानंतर राज्यमंत्री संजय देशमुख यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. मात्र, आता राठोड यांनी शिवसेनेतील शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेने दिग्रस मतदारसंघात संजय राठोड यांचा पराभव करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. संजय देशमुख यांच्या प्रवेशानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की सध्या माझी भूमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण बोलणारा मी एक आणि ऐकणारे विद्यार्थी खूप आहेत. ज्या ज्यावेळी शिवसेनेवर आघात झाले तेव्हा शिवसेना दसपट मोठी होते, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या