JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / धक्कादायक! मुलांना सांभाळण्याच्या टेंशनमुळे पित्याने पोटच्या 2 पोरांचा आवळला गळा

धक्कादायक! मुलांना सांभाळण्याच्या टेंशनमुळे पित्याने पोटच्या 2 पोरांचा आवळला गळा

महामार्गावर वाहनांची तपासणी करताना खूनाचा उलगडा झाला असल्याची माहिती पोलिसांकडू देण्यात आली आहे. तर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात

Bloody theme lone murderer: the murderer shows bloody hands and experiencing depression and pain

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 09 ऑक्टोबर : साताऱ्यामध्ये खुनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पित्याने पोटच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साताऱ्याती शिरवळ इथे बुधवारी पहाटे ही घटना घडली आहे. महामार्गावर वाहनांची तपासणी करताना खूनाचा उलगडा झाला असल्याची माहिती पोलिसांकडू देण्यात आली आहे. तर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. चंद्रकांत मोहिते असं आरोपी पित्याचं नाव आहे. चंद्रकांत हा घाटकोपरला राहणारा आहे. चंद्रकांत हा मुलांना घेऊन जात असताना त्याने महामार्गावरच गाडी बाजूला घेऊन मुलांची हत्या केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रतिक मोहिते (वय 7) आणि गौरवी (वय 11) अशी मृत मुलांची नावं आहेत. दरम्यान, मुलांचे सांगोपन कोण करणार या कारणातून पित्याने हे कृत्य केलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. इतर बातम्या - आम्ही एकत्र येऊ; कारण… शरद पवार थकलेत आणि आम्ही सुद्धा! आरोपी चंद्रकांत हे एकटे त्यांच्या मुलांना सांभाळत होते. ते कामानिमित्त घाटकोपरला राहायचे तर ते कोणत्यातरी आजाराने त्रस्त होते. त्यामुळे मुलांना कसं सांभाळणार या विचारात त्याने चक्क आपल्या पोटच्या मुलांना जीवे मारलं आहे अशी माहिती आरोपी पित्याने पोलिसांना दिली आहे. इतर बातम्या - राज ठाकरेंच्या अडचणी संपेनात, पुण्याच्या सभेत आणखी एक ख्वाडा? महामार्गावर वाहनांची तपासणी करताना गाडीमध्ये पोलिसांना 2 मुलांचे मृतदेह आढळून आले आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपी चंद्रकांतला ताब्यात घेतलं असून पोलीस सध्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 2 मुलांचे मृतदेह ताब्यात घेतलं असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, दोन्ही मुलांना अशा प्रकारे गमावल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. इतर बातम्या - असा आहे मान्सूनच्या परतीचा मार्ग, मुंबईसह या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या