JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / CWG 2022 : झंडा ऊँचा रहेगा हमारा...! बर्मिंगहममध्ये टीम इंडिया इतिहास घडवण्यासाठी सज्ज

CWG 2022 : झंडा ऊँचा रहेगा हमारा...! बर्मिंगहममध्ये टीम इंडिया इतिहास घडवण्यासाठी सज्ज

बर्मिंगहॅममध्ये 22 वी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2022) सुरू झालीय. या स्पर्धेत इतिहास घडवण्यासाठी आणि इंग्रजांच्या भूमीत स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिद्धेश कानसे, मुंबई, 30 जुलै :  यंदा आपण स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करतोय. देशाला स्वातंत्र्य मिळून येत्या 15 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. याच दरम्यान आपल्यावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या भूमीत भारतीय क्रीडापटू दाखल झाले आहेत, आपला तिरंगा मानाने फडकवण्यासाठी. निमित्त आहे ते बर्मिंगहॅममध्ये सुरु झालेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा (CWG 2022) स्पर्धांचं. बर्मिंगहॅममध्ये 8 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या क्रीडासोहळ्यात (Commonwealth Games 2022)  भारतासह जवळपास 72 देश सहभागी झाले आहेत. ऑलिम्पिक आणि एशियाडनंतरची सर्वात मोठी स्पर्धा असा या स्पर्धेचा लौकिक आहे. यंदा ही स्पर्धा इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरात आयोजित करण्यात आली आहे. आणि त्यासाठी 215 जणांचं भारतीय पथक देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहे. अपेक्षा मोठ्या, आव्हान खडतर खरं तर गेल्या दोन दशकात जागतिक स्तरावरच्या स्पर्धांमध्ये भारताचा आलेख कमालीचा उंचावलाय. राष्ट्रकुल स्पर्धेचा विचार करता 1998 पासून ते गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या मागच्या स्पर्धेपर्यंत भारताच्या पदकांच्या खजिन्यात मोठी भर पडली आहे. 2018 साली यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडपाठोपाठ भारत पदकतालीकेत 25 सुवर्ण पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे बर्मिंगहॅममध्येही भारतीय खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पण, यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदकतालीकेत मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी खेळाडूंना मोठा संघर्ष करावा लागणार हेही तितकंच खरं आहे. याचं कारण भारतानं राष्ट्रकुलमध्ये आजवर ज्या इव्हेंटमध्ये सर्वाधिक पदकं मिळवली त्या नेमबाजीचा यंदाच्या स्पर्धेत समावेश नाही. भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. 2018 साली भारताने मिळवलेल्या 64 पदकांपैकी 16 पदकं नेमबाजीतली होती. स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात भारतीय नेमबाजांनी 63 सुवर्ण पदकांसह 135 पदकांची रास रचली आहे. पण यंदा मात्र तो ‘लक्ष्यभेद’ करण्याची संधी नेमबाजांना नाही. फलंदाजी ते गोलंदाजी, टीम इंडिया खमकेपणाने खेळली, दणकेबाज जिंकली, विंडीजचा खतरनाक पराभव दुसरीकडे स्पर्धेच्या काही दिवस आधीच ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या नीरज चोप्राच्या रूपात भारताला आणखी एक धक्का बसला. गेल्या वर्षभरात भारतीय क्रीडाविश्वाचा पोस्टर बॉय बनलेल्या नीरजनं जागतिक अथलेटिक्समध्येही नुकतच विक्रमी रौप्यपदक मिळवलं. त्यामुळे राष्ट्रकुलमध्येही त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. पण फिटनेसमुळे नीरजनं स्पर्धेतून माघार घेतली आणि चाहत्यांचा अपेक्षांना सुरुंग लागला. पदकाचे प्रबळ दावेदार असं असलं तरी, टीम इंडिया या स्पर्धेत चमकदार कामगिरी करेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. कुस्ती, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी यासारख्या क्रीडा प्रकारात भारताला हमखास पदक मिळेल अशी अपेक्षा आहे. खास लक्ष असेल ते पी. व्ही. सिंधू, निखत झरीन, मीराबाई चानू, रविकुमार दहिया, लक्ष्य सेन, हिमा दास आणि महिला-पुरुष हॉकी संघावर. त्याचबरोबर पुन्हा नव्याने समावेश झालेल्या क्रिकेटमध्येही भारतीय महिला संघाची कामगिरी कशी राहणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. क्रीडा विभागाची सर्वात मोठी कारवाई, बोगस प्रमाणपत्र दाखवत सरकारी नोकरी लाटणाऱ्या 109 जणांना दणका गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं अथलेटिक्समध्ये पहिलंवहिलं पदक जिंकलं. हॉकीतला पदकाचा दुष्काळ संपवला. कुस्ती, बॅडमिंटनमध्ये सातत्य दिसलं. टोकियोतल्या त्या यशानं भारतीय खेळाडूंना एक आत्मविश्वास मिळवून दिलाय. त्यामुळे त्याच आत्मविश्वासानं भारतीय खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत उतरतील आणि बर्मिंगहॅममध्ये भारत स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ दणक्यात साजरा करेल हीच अपेक्षा. ‘बर्मिंगहॅम में जितेगा इंडिया हमारा…!’ ‘झंडा ऊँचा रहेगा हमारा…!’ (लेखक मुक्त पत्रकार आहेत)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या