JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Buldana : अगायायाया बुलडाण्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस? मणी गोळा करण्यासाठी लोकांची दोन तास झुंबड

Buldana : अगायायाया बुलडाण्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस? मणी गोळा करण्यासाठी लोकांची दोन तास झुंबड

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-औरंगाबाद- नागपूर महामार्गावर डोनगावजवळ काहींना सोन्याच्या मण्यासारखे दिसणारे काही मणी पडलेले आढळले

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलडाणा, 12 ऑगस्ट : बुलडाणा (Buldana) जिल्ह्यात एक अजब प्रकार घडल्याने जोरदार चर्चा सुरू आहे. म्हणे बुलडाण्यात सोन्यांच्या मण्यांचा पाऊस पडला. ही बातमी समजताच लोकांची मणी गोळा करण्यासाठी तब्बल दोन तास झुंब्बड लागल्याची माहितीसमोर आल्याने बुलडाण्यात याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई -औरंगाबाद -नागपूर महामार्गावर डोनगावजवळ काल (दि.11) दुपारच्या सुमारास महामार्गाच्याकडेला काहींना सोन्याच्या मानींसारखे मणी पडलेले आढळले.  

बघता बघता ही बातमी परिसरात पसरताच अनेकांनी या ठिकाणी मणी जमा करण्यासाठी धाव घेतली.  महामार्गाच्या कडेला विखुरलेले मणी जमा करण्यात प्रत्येक जण गर्दी करत होता त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर व हे मणी सोन्याचे आहेत का..? याची शहानिशा केल्यावर सर्वांचे भानच उडालं.

हे ही वाचा :  Maharashtra Rain Alert : राज्यात पुढचे चार दिवस ‘या’ जिल्ह्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार तर पुणेकरांनाही इशारा

संबंधित बातम्या

हे मणी सोन्याचे नसून वेगळ्याच धातूचे निघाले व महामार्गावरून जाताना एखाद्या महिलेच्या गळ्यातील पोथ तुटून रस्तावर विखुरले गेले असल्याचं लक्षात आल्यावर दोन तासांनी नागरिकांनी गर्दी कमी केली .यामुळे मात्र मुंबई नागपूर महामार्ग ठप्प झाल्याने पोलिसांना पाचारण करावं लागलं हे नक्की.

संपूर्ण विदर्भ जलमय

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यामध्ये अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो. तसेच बुलडाणा, वाशीम जिल्ह्याच्याही अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील ज्या तालुक्यांना अतिवृष्टीचा धोका आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Beed : दुष्काळी भागात फुलवली मेक्सिकोतील फळबाग; आधुनिक शेतीतून महिलेची लाखोंची कमाई

त्यामध्ये प्रामुख्याने चामोर्शी, गडचिरोली, वडसा, कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गोंदिया, तिरोडा, आमगाव, गोरेगाव, भंडारा, तुमसर, लाखणी, लाखांदुर, मुल, सावली, लाखणी, लाखांदुर, नागपूर रामटेक, पारशिवणी, मौदा, ऊमरेड, सावनेर, नरखेड, कामठी, पाचगाव, धामणा, कुही, भिवापूर, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, अचलपूर, धारणी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, दर्यापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर, जळगाव जामोद, शेगाव, मेहकर, कारंजा, मंगरुळपीर, नेरपरसोपंत, बाभुळगाव, यवतमाळ या तालुक्यांचा समावेश आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या