मुंबई, 31 जुलै : ‘आम्ही भाजपच्या (bjp) कार्यक्रमला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवन ही तोडू असा थेट इशारा भाजपचे आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी शिवसेनेला दिला. प्रसाद लाड यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. भाजप पदाधिकारीच्या कार्यक्रमासाठी प्रसाद लाड माहीममध्ये आले होते. गेल्या महिन्यात शिवसेना भवनावर माहीम येथील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होतं. कार्यकर्त्यांशी बोलत असताना प्रसाद लाड यांनी थेट शिवसेनेला इशाराच दिला. वेळेपेक्षा अर्धा तास जास्त काम करावं लागलं तरी कंपनीला द्यावा लागणार ओव्हरटाइम आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर असतील किंवा मी असेल, आता यापुढे जे बालेकिल्ला बालेकिल्ला म्हणत आहे ते पाडण्याचे काम आम्ही करणार आहोत. कारण किल्ले फक्त शिवाजी महाराज यांचे आहे. आता यांचे किल्ले आम्ही पाडणार आहोत, बालेकिल्ला वगैरे काही नाही, असंही लाड म्हणाले.
त्यावेळी जो भाजपचा मतदारसंघ होता, तो अजूनही आपल्यासोबत कायम आहे. आता तर नारायण राणे आणि राणे कुटुंबाला माणणारा मोठा वर्ग भाजपसोबत आला आहे. त्यामुळे पुढच्यावेळी नितेशजी आपण कार्यकर्ते कमी आणू, कारण आपण आलो की, पोलीसच पुढे येतात. त्यामुळे त्यांना ड्रेसमध्ये येऊ नका असं सांगूया, म्हणजे, ते हॉलमध्ये तरी बसतील. कारण, एवढी त्यांना भीती आहे की, आम्ही माहीममध्ये आलो तर शिवसेना भवन फोडून काढतील. काय घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू, असं चिथवणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.
आपल्या विधानामुळे वाद निर्माण झाला हे लक्षात आल्यानंतर प्रसाद लाड यांनी लगेच यू टर्न घेतला. प्रसाद लाड यांनी ट्वीट करून आपल्या विधानाबद्दल सारवासारव केली. शिवसेनाप्रमुख यांचा आम्ही नेहमी आदर करतो आणि त्यांच शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही. प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं प्रसाद लाड म्हणाले.