JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात 'हे' 4 स्पर्धक 100 टक्के येण्याची शक्यता

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात 'हे' 4 स्पर्धक 100 टक्के येण्याची शक्यता

बिग बॉस घरात जाणाऱ्या स्पर्धकांची संभाव्य यादी समोर आली होती. ज्यात टेलिव्हिजनवरील अनेक प्रसिद्ध कलाकारांचा समावेश होता. इतक्या कलाकारांपैकी बिग बॉसच्या घरात नेमकं कोण जाणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यातील चार नाव समोर आली आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 सप्टेंबर  :  टेलिव्हिजनवरील सर्वाधिक टीआरपी मिळवून कायम चर्चेत असलेला बिग बॉस हा शो लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बिग बॉस मराठी सीझन  4 ची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. अभिनेते महेश मांजरेकरचं बिग बॉस मराठी होस्ट करणार असल्याचं समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली आहे. मराठी कलाकार, राजकारणी आणि समाजकारण्यांची धम्माल पाहण्यासाठी आणि मांजरेकर स्पर्धकांची कशी शाळा घेतायत हे पाहण्यासाठी सगळचे आतूर झालेत. यावेळी सोशल मीडिया स्टार्सही बिग बॉसच्या घरात दिसण्याची शक्यता आहे.  पण बिग बॉसच्या घरात पाहायला जाणारे स्पर्धक नेमके आहेत कोण हे देखील जाणून घेण्यासाठी सगळे एक्साइड झालेत.  बिग बॉसच्या चौथ्या पर्वात 100 दिवसांसाठी घरात जाणाऱ्या 4 स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. बिग बॉस घरात जाणाऱ्या स्पर्धकांची संभाव्य यादी समोर आली होती. ज्यात टेलिव्हिजनवरील अनेक प्रसिद्ध कलाकारांचा समावेश होता. इतक्या कलाकारांपैकी बिग बॉसच्या घरात नेमकं कोण जाणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यातील चार नाव समोर आली आहेत. हे स्पर्धक 100 टक्के बिग बॉस मराठी 4 च्या घरात जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. कोण आहेत ते चार कलाकार जाणून घ्या. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: ‘या’ दिवशी सुरू होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन; कोण असणार स्पर्धक? तेजश्री जाधव

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधवनं दाक्षिणात्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. एमएक्स प्लेअरवरील ‘द जोकर : अ स्ट्रेंज किडनेपर’ या हिंदी सिरीजमध्ये ती दिसली होती. त्याचप्रमाणे ‘अट्टी’ या तमिळ सिनेमात आणि ‘अकीरा’ , ‘माधुरी टॉकिज’ या हिंदी वेब सीरिजमध्ये तिनं काम केलं आहे. शर्वरी लोहोकरे

अनेक मराठी मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री शर्वरी लोहोकरे बिग बॉस मराठी 4मध्ये दिसणार आहे. शर्वरी नुकतीच अक्षय कुमार आणि कतरिना यांची मुख्य भूमिका असलेल्या सूर्यवंशी सिनेमात एटीएस पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. रुचिरा जाधव माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील माया ही भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधवला बिग बॉस मराठी 4 साठी विचारण्यात आलं होतं. रुचिरानं यासाठी होकार दिला असून तीही बिग बॉसच्या घरात धिंगाणा घालताना दिसणार आहे. तुषार गोसावी

सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग असलेला युट्यूबर तुषार गोसावी बिग बॉस मराठी 4मध्ये सहभागी होणार आहे. तुषार गोसाली हा पहिला मराठी सोशल मीडिया रोस्टर आहे.  तुषारला बिग बॉस मराठी 3 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री देण्यात येणार होती असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं होतं. पण तो तिसऱ्या पर्वात दिसला नाही. चौथ्या पर्वासाठी तुषारची निवड झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या