JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सलमानच्याच पावलांवर पाऊल ठेवतं कतरिनानेही घेतली महागडी कार

सलमानच्याच पावलांवर पाऊल ठेवतं कतरिनानेही घेतली महागडी कार

कतरिनाला महागड्या गाड्या खरेदी करण्याचं वेड आहे. तिच्याकडे याआधीच अनेक महागड्या गाड्या आहेत. आता त्या गाड्यांच्या तफ्यात अजून एका गाडीचा समावेश झालाय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मे- बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच ‘भारत’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच कतरिनाचा सिनेमातला लुक पसंत केला जात आहे. सिनेमांव्यतिरिक्त कतरिनाबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच तिने स्वतःसाठी एक लग्झरी कार घेतली आहे. सोशल मीडियावर गाडीसोबतचा फोटो शेअर करून तिने याबद्दलची माहिती दिली. कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रेंज रोवर गाडी सोबतचा एक फोटो शेअर केला. यात तिने पांढऱ्या रंगाचे बूट घातले आहेत आणि डेनिम जॅकेटही घातलं आहे. कतरिनाला महागड्या गाड्या खरेदी करण्याचं वेड आहे. तिच्याकडे याआधीच अनेक महागड्या गाड्या आहेत. आता त्या गाड्यांच्या तफ्यात अजून एका गाडीचा समावेश झालाय. हनीमूनला पॅरिसला जातो सांगून शाहरुख या ठिकाणी घेऊन गेला गौरीला, स्वतः केला खुलासा

‘या बाईने माझ्या भावाला फसवलंय’, मान्यतासाठी प्रियाने संजय दत्तला सुनावलं कतरिनाने ही गाडी वरळी येथील मोदी मोटर्समधून घेतली. जग्वारची लँड रोवरची ही गाडी आहे. या गाडीची किंमत कोटींमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खाननेही लँड रोवरची गाडी विकत घेतली होती. ही गाडी विकत घेतल्यानंतर असं म्हटलं जात होतं की, सलमान ही गाडी कतरिनाला भेट म्हणून देणार आहे. पण नंतर कळलं की सलमानने ती गाडी स्वतःसाठीच विकत घेतली होती. ‘आता सगळं लीगल आहे’, म्हणत या अभिनेत्रीने केलं दुसऱ्या अभिनेत्रीला प्रपोज कतरिनाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती सलमान खानसोबत भारत सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातली तिची भूमिका नेमकी काय असणार आहे याबद्दल अजून कोणताही खुलासा झालेला नाही. पण तिचा लुक मात्र अनेकांनाच पसंत पडत आहे. या सिनेमानंतर कतरिना करण जोहरची निर्मिती असलेल्या सूर्यवंशी सिनेमातही दिसेल. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार असणार आहे. VIDEO: ‘त्या’ बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या