वेगावर नियंत्रण ठेवा, एक्सप्रेस वे बनतोय मृत्यूचा महामार्ग?

गेल्या १६ वर्षात एक्स्प्रेस वे वर पाच हजार अपघात झालेत तर या अपघांमध्ये तब्बल दीड हजार जणांचे मृत्यू झालेत, त्यामुळे कमी झालेल्या वेगाची आणि वाचलेल्या वेळेची आणखी किती किंमत द्यावी लागणार असा प्रश्न आहे.

Ajay Kautikwar
वैभव सोनावणे,पुणे,07 मे: सध्या सुट्ट्यांचा मोसम सुरू आहे. गावी जाताना अनेकांना मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करावा लागतो. मात्र जरा सावधान... कारण मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरचा प्रवास आतापर्यंत दीड हजार प्रवाशांसाठी अखेरचा प्रवास ठरलाय. मात्र प्रशासनाला याचं काहीच सोयरसुतक नसल्याचं दिसतंय.राज्यात सध्या रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे. मुंबई पुण्यादरम्यानच्या प्रवासाचा वेग वाढावा, वेळ वाचावा यासाठी मध्ये कुठलाही अडथळा नसलेला देशातला पहिला एक्सप्रेसवे बनवण्यात आला होता मात्र वेग वाढवण्याच्या आणि वेळ कमी करण्याच्या नादात गेल्या १६ वर्षात त्याची जबर किंमत आपल्याला मोजावी लागली आहे.गेल्या १६ वर्षात एक्स्प्रेस वे वर पाच हजार अपघात झालेत तर या अपघांमध्ये तब्बल दीड हजार जणांचे मृत्यू झालेत, त्यामुळे कमी झालेल्या वेगाची आणि वाचलेल्या वेळेची आणखी किती किंमत द्यावी लागणार असा प्रश्न आहे.

जेवढ्या वेगानं या महामार्गावरून वाहनं धावताहेत, तेवढ्याच वेगानं अपघात आणि त्यात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या 16 वर्षांत या एक्स्प्रेस वेवर 5 हजार अपघात झालेत आणि या अपघातात दीड हजाराहून अधिक प्रवाशांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय.गेल्या 10 वर्षांतल्या अपघाताच्या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेला मृत्यूच्या सापळ्याची उपमा दिली तर चुकीचं ठरणार नाहीमृत्यूचा सापळा?२००६- ९४ प्रवाशांचा मृत्यू२००७- ९९ प्रवाशांचा मृत्यू२००८- १६५ प्रवाशांचा मृत्यू२००९- १३१ प्रवाशांचा मृत्यू२०१०- १०४ प्रवाशांचा मृत्यू२०११- ११८ प्रवाशांचा मृत्यू२०१२- ४३ प्रवाशांचा मृत्यू२०१३- २९ प्रवाशांचा मृत्यू२०१४- १३३ प्रवाशांचा मृत्यू२०१५- ११८ प्रवाशांचा मृत्यू२०१६- १५१ प्रवाशांचा मृत्यू२०१७- १०५ प्रवाशांचा मृत्यूअपघाताची ही आहेत प्रमुख कारणंआंतराराष्ट्रीय मानकांनुसार असलेल्या सुरक्षिततेच्या अनके उपाययोजना एक्स्प्रेस वे वर दिसतच नाहीत अशी टीका सामाजिक कार्यकर्ते तन्मय पेंडसे यांनी केली आहे. प्रत्येकवेळी प्रशासनाकडून अपघात रोखण्यासंदर्भात बैठका घेतल्या जातात, चर्चा होते मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केलीय. 

Trending Now