JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 7 वर्षाच्या चिमुरड्याची दगडाने ठेचून हत्या, मृतदेह फेकला जंगलात

7 वर्षाच्या चिमुरड्याची दगडाने ठेचून हत्या, मृतदेह फेकला जंगलात

अंबरनाथमध्ये एक ह्दय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

जाहिरात

बिझनेस पार्टनर जसकरण सिंहला पैसे परत देता येत नसल्याने आरोपी हरनेकने आपल्या पत्नी आणि मित्राच्या साहाय्याने जसकरणची हत्या केली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 ऑगस्ट : अंबरनाथमध्ये एक ह्दय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे अवघ्या सात वर्षाचा चिमुरड्याची अमानुषपणे हत्या करणात आली आहे. अजून पर्यंत अद्यापत हत्येचं कारण अस्पष्ट आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारावर तपास सुरू केला आहे.

घटना अंबरनाथच्या डोंगराळ भागातली आहे. इथे गुरुवारी सकाळी सात वर्षाच्या शिवम दिग्विजय रजकचा मृतदेह बुवापाडा खदानमध्ये सापडला. शिवमच दगडाने डोक ठेचून हत्या करण्यात आली आहे.

लोकलमध्ये ‘बच के रहेना रे बाबा’, धावत्या ट्रेनमध्ये साप आढळल्याचा VIDEO व्हायरल

शिवम बराच वेळ घरी न दिसल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शक्य तेवढ्या ठिकाणी शोध घेतल्या नंतरही या चिमुरड्याचा शोध लागला नाहीं. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पण शिवमचा संगळ्या ठिकाणी शोध घेतला. यादरम्यान, बुवापाडा खदानमध्ये एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शिवमचाच असल्याची खात्री कुटुंबीयांनी करून करण्यात आली.

अंबरनाथ पोलिसांनी शिवमचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अजूनपर्यंत यात कोणतेही धागेदोरे हाती लागले नाही. कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानुसार पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.भरधाव वेगात 2 चारचाकी धडकल्या, 4 जणांचा जागीच मृत्यू

यादरम्यान, शिवमचा हत्येमुळे अंबरनाथ परिसरात शोककळा पसरली आहेत. शिवम आपल्यात नसल्याने संगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. ​नेमक्या कोणत्या कारणावरून ही हत्या करण्यात आली याच गुढ अद्याप कायम आहे.

हेही वाचा…

रेल्वेत स्टंटबाजी करणारे मुंबईचे 4 ‘विलन’ अखेर पोलिसांच्या ताब्यात

VIDEO : टिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला, भाषणावेळी घसरले विखे पाटील

चाकण हिंसेप्रकरणी एका रात्रीत 20 जण घेतले ताब्यात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या