ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्यावर शिंदे गटाने जोरदार आक्रमण केले आहे
ठाणे, 11 फेब्रुवारी : ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्यावर शिंदे गटाने जोरदार आक्रमण केले आहे. राष्ट्रवादीला ठाण्यात मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी 6 नगरसेवक उद्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि शिंदे गटामध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. अखेर आता ६ नगरसेवक उद्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. (‘ठाण्याची गद्दारी, नागपूरची गुलामी’; राहुल कलाटेंविरोधात बॅनर वॉर; पुण्यात राजकारण तापलं!) राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रवेशाकरता ठाण्यात लोकमान्यनगर येथे करण्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. न्यूज १८ लोकमतच्या हाती राष्ट्रवादी पक्ष सोडणाऱ्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची यादी लागली आहे. - हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक - राधाबाई जाधवर, नगरसेवक - दिगंबर ठाकुर, नगरसेवक - वनिता घोगरे, नगरसेवक - संभाजी पंडित, नगरसेवक - संतोष पाटील, परीवहन सदस्य आणि वरीष्ठ पदाधिकारी सुधाकर नाईक, पुरषोत्तम ठाकुर, राजा जाधवर, संदिप घोगरे आणि मंगेश ठाकुर आदी शिंदे गटात प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. (अजितदादांना मुख्यमंत्री करणार? शरद पवार आता स्पष्टच बोलले) दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्वीट करून आव्हाडांना डिवचलं आहे. ठाण्यात सुटलाय तुफान वारा १२ तारखेला कुणाचे वाजणार बारा? असा चिमट म्हस्केंनी आव्हाडांना काढला आहे,
तसंच, बाळासाहेबांच्या सेनेकडे झुंडीने येऊ लागले, राष्ट्रवादीचे नगरसेवक कुणाला ‘आव्हाइड’ करु लागलेत? असा टोमणाही मारला.