JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / वर्ध्यात वीज कोसळल्याने तब्बल 24 मेंढ्या ठार, जिल्ह्यात खळबळ

वर्ध्यात वीज कोसळल्याने तब्बल 24 मेंढ्या ठार, जिल्ह्यात खळबळ

वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात

घटनास्थळी उपस्थित असलेले लोक.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा, 10 जुलै : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. (Nature in Rain) यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. वर्ध्यातही मुसळधार पाऊस होत आहे. (Heavy Rain in Wardha) या पावसादरम्यानच वीज कोसळून याठिकाणी तब्बल 24 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. (Goat died due to lightning) काय आहे घटना - वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात चरायला गेलेल्या बकऱ्यांवर वीज पडली आहे. यामुळे तब्बल 24 बकऱ्या जागीच ठार झाल्या आहेत. तर या घटनेत मेंढपाळ हा थोडक्यात बचावला आहे. ही घटना गिरडच्या बाबा फरीद टेकडी शिवारात घडली. याप्रकरणी पोलीस व मोहगावचे सरपंच घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुकानात शिरले पाणी -  वर्ध्यात काल पावसाने गेल्या तीन तास वादळी पावसासह हजेरी लावली आहे. (Wardha Rain Update) मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील वाहनही दिसेनासी झाली होती. सखल भागात असणाऱ्या शाळेत पाणी शिरले होते. नदी, नाले, शहरातील नाल्या ओसंडून वाहत होते. तसेच काही भागात नाल्या सफाई झाली नसल्याने बाजार परिसरात दुकानातही पाणी शिरल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्रात पावसाचा कहर -  राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने (Monsoon rain update) आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. हेही वाचा -  Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेबद्दल मोठी बातमी! खराब हवामानामुळे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय पावसामुळे महाराष्ट्रात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यात 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या