JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / तुमचं मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? 'या' 10 गोष्टींच्या आधारे करा निश्चित

तुमचं मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? 'या' 10 गोष्टींच्या आधारे करा निश्चित

मुलांना आई-वडिलांच प्रेम मिळालं नाही, तर त्यांच्या मानसिकेतवर गंभीर परिणामही होऊ शकतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मार्च :  पती-पत्नी दोघंही नोकरी करत असतील तर अनेकदा ते त्यांच्या मुलांना फारसा वेळ देत नाहीत. अशावेळी मुलं एकलकोंडी बनण्याचा किंवा चिडचिड करण्याचा धोका असतो. मुलांना आई-वडिलांच प्रेम मिळालं नाही, तर त्यांच्या मानसिकेतवर गंभीर परिणामही होऊ शकतात. त्यामुळेच मुलांना आई-वडिलांचे प्रेम मिळणं आवश्यक असते. मुलांना आई-वडिलांच्या प्रेमाची नेमकी केव्हा सर्वात जास्त गरज असते, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलंय. 1. वारंवार प्रश्न विचारणं जेव्हा तुमचं मूल तुम्हाला मी कसा दिसतोय? हे योग्य आहे का? अशा स्वरुपाचे प्रश्न विचारत असेल, तर ते तुमच्याकडून प्रेमाची आणि पाठिंब्याची अपेक्षा करीत असते. अशावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊन त्यांचे चीअरलीडर व्हा. 2. इतरांपुढे फजिती करणे जेव्हा ते इतरांसमोर तुम्हाला लाजवतात, तेव्हा मुलाची तुमच्याविरुद्ध एकप्रकारे बंडखोरी सुरू झालेली असते. अशावेळी त्यांना तत्काळ याबाबत समजून सांगणं, शिक्षण देणं, हा एक झटपट उपाय वाटू शकतो. मात्र, अशावेळी त्यांच्याशी संभाषण केल्यानं मुलांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होऊ शकते. 3.  एकलकोंडेपणा एखाद्या मुलानं स्वतःला त्याच्या रुममध्ये बंद केलं असेल, आणि कुटुंबासोबत राहणं, मित्रांसोबत राहणं पूर्णपणे सोडून दिलं असेल, मुलं कोणासोबतच मिसळत नसतील, तर त्यांना काही मदतीची प्रचंड आवश्यकता आहे. अशावेळी तुमच्या मुलांसोबत त्यांच्या रुममध्ये बसा, तेथे त्यांच्यासोबत वेळ घालवा, गप्पा मारा. कदाचित, कालांतराने ते पुन्हा सर्वांमध्ये मिसळू शकतात. एंडोमेट्रिओसिसमुळे येतेय आई होण्यात अडचण? डॉक्टरांनी सांगितले योग्य उपाय 4.तुमच्या प्रत्येक गोष्टीवर उत्तरं देणं तुमचं मूल तुम्ही बोलता त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला उत्तर देत असेल, तर तुम्ही बोलणं सोडून अधिक कृती करणं आवश्यक आहे.त्यांच्या जेवणाच्या डब्यात प्रेमानं चिठ्ठी ठेवणं किंवा त्यांच्या घरच्या कामात त्यांना मदत करणं, यासारख्या प्रेमाच्या काही कृती ते तुम्हाला प्रिय आहेत, हे समजण्यास त्यांना मदत करू शकतात. 5. मुलांना प्रेमाची भाषा शिकवा तुमचं मूल तुमच्याशी कसे संवाद साधतं? त्यावरून ते तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याच्या बाबतीत परिपूर्ण जीवन जगत आहेत का, याचं उत्तर मिळतं.  या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक असेल, तर तुम्हाला मुलांविषयी तुमच्या प्रेमाची भाषा बदलण्याची आवश्यकता आहे. 6. वारंवार तक्रार करणं तुमचं मूल वारंवार तक्रार करत असेल की, तुम्हाला पुन्हा कामावरून उशीर झाला आहे किंवा तुम्ही शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या दिवशी त्याला परफॉर्म करताना पाहण्यासाठी आला नाहीत, तर तुम्हाला स्वतःचं आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. भारतातल्या ‘या’ जमातीत गोरं मुल जन्माला येणं पाप! देतात मृत्यूची शिक्षा 7. छोटछोट्या गोष्टीवरून भांडणं मुलांची सर्व भांडणं दुर्लक्षित केली जाऊ शकत नाहीत. कधीकधी मुलं त्यांना तुमच्याकडून प्रेम मिळावं, यासाठी असं वागतात. अशावेळी तुम्ही वेळीच लक्ष देऊन एक पालक म्हणून मुलांना प्रेम देत आहात ना, याची खात्री करा. 8. वात्रटपणा करणे मुलांना एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याला विरोध करण्यासाठी ते वात्रटपणा करतात. त्यावेळी पालकांनी त्यांना प्रेमानं समजावून सांगणे आवश्यक आहे. 9. अबोल राहणे एखाद्या मुलानं बोलणं बंद केलं असेल किंवा ते शांत राहात असेल, तर काहीतरी समस्या आहे, हे लक्षात घ्या. अशावेळी तुमच्या मुलाला बाहेर फिरायला घेऊन जा. त्याचा विश्वास संपादन करा ते तुमच्यासोबत समस्या शेअर करेल. 10. विचित्र वागणं तुमच्या मुलानं त्याची रुम अस्वच्छ ठेवली असेल, तो मित्रांना भेटत नसेल, थोडा विचित्र वागत असेल, तर अशावेळी तुम्ही त्याच्यासाठी काही तरी खास त्याच्या आवडीची डिश बनवा, आणि त्याच्यासोबत खा. ही कृती मुलाचं वागणं सुधारण्यास उपयोगी ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या