JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / संसार पुन्हा थाटणार, उद्धवनी दिले युतीचे संकेत

संसार पुन्हा थाटणार, उद्धवनी दिले युतीचे संकेत

19 ऑक्टोबर : शिवसेना आणि भाजपचा 25 वर्षांचा संसार जागावाटपावरुन मोडला पण आता जागांसाठी पुन्हा एकत्र येण्याची चिन्ह आहेत. मतमोजणीचा निकाल आता स्पष्ट झालाय. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजप आणि घटकपक्षांनी सर्वाधिक 111 जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजपने तब्बल 110 जागांवर मजल मारली आहे. मात्र भाजपला बहुमताने हुलकावणी दिली आहे. जो पक्ष महाराष्ट्राचा विकास करेल त्याला आपला पाठिंबा राहिल अशी भूमिका आता शिवसेनेनं घेतली आहे. एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा युती करण्याचे संकेत दिले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

fadanvis_udhav_thackarey 19 ऑक्टोबर : शिवसेना आणि भाजपचा 25 वर्षांचा संसार जागावाटपावरुन मोडला पण आता जागांसाठी पुन्हा एकत्र येण्याची चिन्ह आहेत. मतमोजणीचा निकाल आता स्पष्ट झालाय.

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजप आणि घटकपक्षांनी सर्वाधिक 111 जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजपने तब्बल 110 जागांवर मजल मारली आहे. मात्र भाजपला बहुमताने हुलकावणी दिली आहे. जो पक्ष महाराष्ट्राचा विकास करेल त्याला आपला पाठिंबा राहिल अशी भूमिका आता शिवसेनेनं घेतली आहे. एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा युती करण्याचे संकेत दिले आहे.

विशेष म्हणजे युती तुटण्यास उद्धव यांनी भाजपलाच जबाबदार धरले होते. भाजपवर उद्धव यांनी अफझल खान, उंदीर अशा शब्दात टीका केली होती. मात्र भाजपच्या नेत्यांनी बहुमतासाठी गरज जर पडली तर शिवसेनेचा पाठिंबा घेऊ असे जाहिरपणे व्यक्तव्य केलं होतं. आता परिस्थिती अपेक्षेप्रमाणे उद्भावली आहे त्यामुळे भाजप आणि सेनेचा संसार पुन्हा थाटतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या