JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / संसदेच्या अधिवेशनाचं सूप वाजलं, अडवाणींच्या डोळ्यात तरळले अश्रू

संसदेच्या अधिवेशनाचं सूप वाजलं, अडवाणींच्या डोळ्यात तरळले अश्रू

21 फेब्रुवारी : संसदेच्या अधिवेशनाचं आज सूप वाजलं. 15 व्या लोकसभेचा कार्यकाळ आज संपला. मात्र या 15 लोकसभेत सर्वात कमी काम झालंय. एवढेच नाही तर अनेक मुद्यावरुन आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी लोकशाहीला वेशीवर टांगत अक्षरश: धुमाकूळ घातला. अलीकडेच तेलंगणाच्या मुद्द्यावरुन खासदारांनी केलेला राडा अवघ्या देशाने पाहिला. पण आज 15 व्या लोकसभेचा शेवट गोड झाला. लोकसभेत खासदारांनी एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेतला. यावेळी 40 वर्षापासून लोकसभेच्या कामकाजात सहभाग घेणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

loksbha4 21 फेब्रुवारी : संसदेच्या अधिवेशनाचं आज सूप वाजलं. 15 व्या लोकसभेचा कार्यकाळ आज संपला. मात्र या 15 लोकसभेत सर्वात कमी काम झालंय. एवढेच नाही तर अनेक मुद्यावरुन आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी लोकशाहीला वेशीवर टांगत अक्षरश: धुमाकूळ घातला. अलीकडेच तेलंगणाच्या मुद्द्यावरुन खासदारांनी केलेला राडा अवघ्या देशाने पाहिला. पण आज 15 व्या लोकसभेचा शेवट गोड झाला.

लोकसभेत खासदारांनी एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेतला. यावेळी 40 वर्षापासून लोकसभेच्या कामकाजात सहभाग घेणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. यूपीए-2 सरकारच्या कारकिर्दीतलं हे शेवटचं अधिवेशन होतं. आता पुढचं अधिवेशन निवडणुकीनंतर नव्या सरकारच्या स्थापनेनंतर होणार आहे. या अधिवेशनात कामकाजाचे अनेक दिवस वाया गेले, मात्र अनेक महत्त्वाची विधेयकंही याच लोकसभेनं मंजूर केली.

भ्रष्टाचारविरोधी सहा महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न होता. पण तेलंगणावर झालेल्या गदारोळामुळे ही विधेयकं मंजूर होऊ शकली नाहीत. आता या विधेयकांसाठी वटहुकूम काढण्याचा पर्याय सरकारसमोर आहे. यूपीए सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये म्हणजे 15 व्या लोकसभेत आतापर्यंत सर्वात कमी काम झालंय.

मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात फक्त 165 विधेयकं पास झाली तर 126 विधेयकं दोन्ही सभागृह रखडली आहे. यापैकी लोकसभेत 72 विधेयकं रखडली असून आज कार्यकाळ संपल्यामुळे ही विधेयकं रद्द झाली आहे. खरं पाहता संसदेचं कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी सरकारची आहे पण ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यात अपयश आलं हे काँग्रेसने मान्य केलंय. आता आगामी 16 व्या लोकसभेत नवीन येणारे लोकप्रतिनिधी देशाच्या जनतेसाठी कसं काम करता हे पाहण्याचं ठरेल.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या