1 जून : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेनं 18 खासदार निवडून आणत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयाचा जल्लोष आज अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात साजरा होणार आहे. या ‘विजयी जल्लोषा’चं आयोजनही तितक्याच भव्य प्रमाणात करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात शिवसेनेेच्या मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खास मनोरंजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
या जल्लोष सभेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल निवडणूक लढवण्याचं जाहीर करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरही दावा ठोकला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतायेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ‘दिल्लीत मोदी सरकार तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार’ असे होर्डिंग्ज या आधीच मुंबईत लागले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे हे देखिल मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरणार का याचीही उत्सुकता आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++