22 जानेवारी : लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. जर आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर कुणाची सत्ता येईल यासाठी आयबीएन नेटवर्क यांच्यासाठी सीएसडीएसने सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार जर आज निवडणुका झाल्या तर यावेळी शिवसेना, भाजप, रिपाइं आणि अलीकडे सामिल झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महायुती बाजी मारेल आणि आघाडी सरकारला विरोधी बाकावर बसावे लागेल.
एकूण 48 जागांसाठीच्या या निवडणुकीत महायुतीला 25 ते 33 जागा मिळतील. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 12 ते 20 जागा मिळतील. आणि इतर पक्षांना 1 ते 5 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. यामध्ये मनसेचाही समावेश आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर, जुलै महिन्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची टक्केवारी 43 टक्के होती. तीच टक्केवारी चालू जानेवारी महिन्यामध्ये 35 टक्क्यांवर आली आहे.
महायुतीची टक्केवारी जुलै महिन्यात 36 टक्के होती तीच टक्केवारी जानेवारी महिन्यात 44 टक्के इतकी झाली आहे. मनसेची टक्केवारी जुलैमध्ये 5 टक्के होती ती जानेवारीमध्ये 2 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. तर दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने धडाकेबाज कामगिरी करुन सत्ता स्थापन केली. ‘आप’ महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडणूक लढत आहे पण ‘आप’ची मतांची टक्केवारी ही 5 इतकी आहे. तर बसपाची 4 टक्के आणि इतर पक्षांची 10 टक्के आहे.
‘आघाडी सरकार पुन्हा नको’
आदर्श सोसायटी घोटाळा, सिंचन घोटाळा आणि अनेक मंत्र्यांचे घोटाळे यामुळे वैतागलेल्या महाराष्ट्राच्या मतदारांनी आघाडी सरकारसाठी दार लावून घेतलंय. त्यामुळे आघाडी सरकारला पुन्हा संधी द्यावी का ? असा प्रश्न विचारला असता 57 टक्के लोकांनी नकार दिलाय तर 26 टक्के लोकांनीच होकार दिलाय. महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का ? असा प्रश्न मतदारांना विचारला असता 38 टक्के लोकांनी समाधानी असल्याचं सांगितलं तर 48 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचं सांगितलं. मि.क्लिन मुख्यमंत्री म्हणून ओळख प्राप्त झालेले पृथ्वीराज चव्हाण यांची कामगिरी कशी वाटते ? या प्रश्नावर 50 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलंय तर 36 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे आघाडीत बिघाडीच नाट्य अनेक वेळा राजकीय पटलावर आलं. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी तोडून स्वतंत्र निवडणूक लढवावी असं 22 टक्के लोकांना वाटतंय तर आघाडी कायम ठेवून लढावं असं 26 टक्के लोकांना वाटतंय. विशेष म्हणजे 52 टक्के लोकांना माहीतच नाही असं सांगितलंय. त्यामुळे 100 टक्क्यांपेक्षा फक्त 50 टक्के मतदारांनाच आघाडीच्या भवितव्याची चिंता आहे असं दिसून येतंय. ‘मनसेचं इंजिन वेगळंच राहू द्या’, महायुतीत-मनसे नको महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याचं वेगळं महत्व आहे. त्यामुळे मग महापालिकेची निवडणूक असो अथवा लोकसभेची निवडणूक शिवसेना आणि मनसे या दोन मराठीसाठी लढणार्या पक्षाकडे अपेक्षनं पाहिलं जातं. शिवसेना आणि मनसेनं एकत्र यावं अशी चर्चाही अनेक वेळा झाली. पण ‘एकला चलो रे’ या भूमिकेमुळे दोन्ही पक्ष आपआपल्या मार्गाने मार्गक्रमण करत आहे. हाच धागा पकडून ‘कुणी कुणाशी युती करावी असा सवाल मतदारांना विचारला असता भाजप,शिवसेना आणि रिपाइं यांच्या युतीला 51 टक्के लोकांनी योग्य सांगितलंय. तर मनसे, भाजप, शिवसेना आणि आरपीआय यांनी युती करावं असं फक्त 6 टक्के लोकांना वाटतंय. तसंच भाजप वगळून शिवसेना आणि मनसेने एकत्र यावं असं 11 टक्के लोकांना वाटतंय. राज ठाकरे आणि मोदींची मैत्री सर्वश्रूत्र आहे त्यामुळे मनसे आणि भाजपने एकत्र यावं असं 9 टक्के लोकांना वाटतंय. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला फक्त 8 टक्के लोकांनी योग्य आघाडीची पावती दिलीय. त्यामुळे मनसेनं लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढवावी असं 33 टक्के लोकांना वाटतंय तर 28 टक्के लोकांना युती करावी असं वाटतंय. आणि 39 टक्के लोकांनी माहीत नाही असं उत्तर दिलंय. एकंदरीतच चर्चा काहीही असो मतदारराजाने मात्र वेगळाच कौल दिलाय. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे मराठीमनाचा कौल महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चित्र तर या सर्व्हेवरुन स्पष्ट होतंय पण महाराष्ट्राची जनता देशाच्या नेतृत्वासाठी सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात देऊ इच्छितो हेही महत्वाचं आहे. त्यामुळे सत्ताधारी यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का ? असा सवाल विचारला असता, 25 टक्के लोकांनी होकार दिलाय तर 59 टक्के लोकांनी नकार दिलाय. तर 16 टक्के लोकांनी माहीत नाही असं म्हटलंय. यानंतरचा प्रश्न साहजिकच देशाचा पंतप्रधान कोण असावा. तर 40 टक्के महाराष्ट्रीयन जनतेला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे असा कौल दिलाय तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना फक्त 14 टक्के लोकांनी पसंती दिलीय. भारताच्या राजकारणात नव्याने दाखल झालेले अरविंद केजरीवाल पंतप्रधान व्हावे असं 4 टक्के लोकांनी वाटतंय. तर महाराष्ट्राच्या राजकारणातले मुरब्बी नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान व्हावे असं 3 टक्के लोकांना वाटतंय. ===================================================================== लढाई लोकसभेची - मागोवा महाराष्ट्राचा ===================================================================== 1. पक्षनिहाय मतांची अंदाजे टक्केवारी पक्ष जुलै 2013 जानेवारी 2014 ————————————————————- भाजप 36% +9% शिवसेना 6% -2% आरपीआय(A) 2% +1% काँग्रेस 29% -8% राष्ट्रवादी काँ. 6% 0 मनसे 2% -3% AAP - +5% बसपा 4% -4% इतर 10% +2% ——————————————————- ===================================================================== 2. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत तुमचं मत काय ?
=====================================================================
3. मनसेनं लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवावी का ?
===================================================================== 4. कुणी कुणाशी युती करावी असं तुम्हाला वाटतं ?
=====================================================================
5. सरकारनं आदर्श अहवाल फेटाळला, यावर तुमचं मत काय ?
=====================================================================
6. मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे की विरोध ?
=====================================================================
7. सरकारनं हाताळलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनावर तुम्ही समाधानी आहात का ?
=====================================================================
8. महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का ? 2013 2014 * समाधानी - 64% 38% * असमाधानी - 29% 48% * माहीत नाही - 7% 14% ===================================================================== 09. मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची कामगिरी कशी वाटते ?
=====================================================================
10. महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारला पुन्हा संधी द्यावी का ? 2013 2014 * हो - 36% 26% * नाही - 48% 57% * माहीत नाही - 16% 17% ===================================================================== 11. यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का ? 2013 2014 * हो - 39% 25% * नाही - 45% 59% * माहीत नाही - 16% 16% ===================================================================== 12. पंतप्रधान कोण व्हावा ?
===================================================================== जागांचा अंदाज - एकूण जागा - 48
पक्ष 2009 2014(अंदाज) ———————————————--——————— काँग्रेस 17 काँग्रेस+राष्ट्रवादी - 12-20 राष्ट्रवादी 8 महायुती - 25-33 शिवसेना 11 इतर - 1-5 भाजप 9 इतर 3 =====================================================================