29 ऑक्टोबर : राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. अजित पवार यांच्यासह 43 माजी संचालकांना सहकार आयुक्तांनी नोटिसा पाठवल्या आहेत. तत्कालीन बरखास्त संचालक मंडळामुळे बँकेचं 1200 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक गैरव्यवहार प्रकरणाचे निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटलांसह राष्ट्रवादीशी संबंधित 25 जण, भाजप आणि शेकापचे प्रत्येकी दोघं आणि शिवसेनेच्या एका संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्वांना 15 दिवसांच्या आत उत्तर देणं बंधनकारक आहे. नाहीतर त्यांना पुढची 6 वर्षे कुठल्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढवता येणार नाही.या सर्व संचालकांवर वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात आलीये. सहकार कायदा कलम 88 अन्वये माजी संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे याआधी बँकेच्या गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकांनी फेटाळला होता. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बँकेचं स्पष्टीकरण अमान्य करत नव्यानं नोटिसा पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सहकार आयुक्तांनी या नोटिसा पाठवल्या आहेत. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++