28 ऑक्टोबर : राज ठाकरेंनी कल्याणमधील प्रचार सभेत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा कामं करायची होती तेव्हा कामं केली नाहीत आणि आता बाळासाहेबांच्या नावाने ही लोकं मतं मागत आहेत, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणमधल्या प्रचारसभेत शिवसेनेवर हल्लाबोल केला. कल्याण-डोंबिवली शहराची संपूर्ण सत्ता माझ्या हातात द्या, बघा कसा कायापालट करतो, असा दावा त्यांनी केला.
आजच्या या प्रचारसभेत राज ठाकरेंनी प्रेझेंटेशनद्वारे नाशिकमध्ये केलेल्या कामांचा लेखजोखा मांडला. नाशिकमध्ये केलेल्या कामांप्रमाणेच कल्याणचाही कायापालट करू, असं म्हणत राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीच्या मतदारांना साद घातली.
मागील वीस वर्षांत जे शिवसेना-भाजपला महानगरपालिकेच्या सत्तेत राहून जे जमले नाही, ते आम्ही साडेतीन वर्षांत करून दाखवले, असे राज ठाकरे यांनी प्रचारादरम्यान म्हटले. मधला काही काळ नाशिक महानगरपालिकेला आयुक्त नव्हते, त्यामुळे आमची कामे रखडली होती, असे म्हणत त्यांनी त्यासाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारवरही टीका केली. जर सत्ताधार्यांनी काम केली असती तर त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मतं मागावी लागली नसती असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++