JOIN US
मराठी बातम्या / देश / 'पैसा नाही, लोकांसाठी काम करायचय'; पोलीस होण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडलेल्या मल्लिकाची कहाणी

'पैसा नाही, लोकांसाठी काम करायचय'; पोलीस होण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडलेल्या मल्लिकाची कहाणी

गावाची सेवा आणि पोलिसाचा गणवेश (police uniform) धारण करण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळं तिनं नोकरी सोडली आणि आंध्र प्रदेशातील राजानगरम (Rajanagaram) या आपल्या गावी परत आली.

जाहिरात

फोटो सौजन्य : एक्सप्रेस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 13 जानेवारी : उच्च शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी मिळवून आपल्या आई-वडिलांचं नाव मोठं करावं, अशी प्रत्येक मुला-मुलीची इच्छा असते. काहींना यामध्ये यश मिळतं तर काहींची ही इच्छा पूर्ण होत नाही. मात्र, जर एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीनं लाखो रुपयांच्या वार्षिक पगाराची नोकरी सोडून गावातील पोलीस पाटलाची नोकरी करण्याचा निर्णय घेतला तर? असा निर्णय घेणारी व्यक्ती नक्कीच शहाणी नाही, अशी कदाचित आपली प्रतिक्रिया असेल. मात्र, गावाची सेवा करण्याच्या ध्येयानं झपाटलेल्या एम मल्लिकाला **(M Mallika)**लोकांच्या या प्रतिक्रियांचा काहीही फरक पडत नाही. एका साधारण गवंड्याची मुलगी असलेल्या मल्लिकानं चार्टर्ड अकाउंटन्सी इंटरमीडिएट कोर्स (Chartered Accountancy Intermediate course) पूर्ण केलेला आहे. तिच्या हातात हैदराबादसारख्या महानगरातील चांगल्या पगाराची नोकरीही होती. पण गावाची सेवा आणि पोलिसाचा गणवेश (police uniform) धारण करण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळं तिनं नोकरी सोडली आणि आंध्र प्रदेशातील राजानगरम (Rajanagaram) या आपल्या गावी परत आली. सीए असलेल्या एम. मल्लिका सध्या गावात महिला पोलीस म्हणून काम करत आहेत. न्यू इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एका साधारण गवंड्याची मुलगी असलेल्या मल्लिकानं अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. पदवीनंतर तिला सीए होण्यामध्ये स्वारस्य निर्माण झालं. शिक्षकांकडून मिळालेलं प्रोत्साहन आणि कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या बळावर मल्लिकाची सीए इंटर पास झाली. सीए इंटरनंतर, तिनं हैदराबादमधील (Hyderabad ) माधापूर येथे एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरी मिळवली. नोकरी करत असताना तिनं 26 देशांमध्ये मान्यता असलेला सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनरचा (CFP) कोर्सदेखील केला. हैदराबादमधील नोकरी तिच्या शैक्षणिक पात्रतेला साजेशी होती. तिला मिळाणाऱ्या पगारामुळे तिच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणी सहज सुटल्या होत्या. मात्र, स्वत: मल्लिका या नोकरीत समाधानी नव्हती. नोकरीचं क्षेत्र कोणतंही असो आता होणार फक्त तुमचीच चर्चा; ‘हे’ Skills असणं आवश्यक या दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारनं (Andhra Pradesh government) राज्यात ग्राम सचिवालय प्रणाली (village secretariat system) आणली. या प्रणालीमध्ये गावांमध्ये महिला पोलिसाच्या (पोलीस पाटील) पदाची तरतूद करण्यात आली. ही आपल्यासाठी चांगली संधी आहे, असा विचार करून पोलिसाच्या नोकरीची आवड असणाऱ्या मल्लिकानं कंपनी सोडली. घरी गेल्यानंतर तिनं ग्रामपंचायतीमध्ये केवळ 13 हजार रुपये मासिक पगार मिळणाऱ्या महिला पोलिसाच्या नोकरीसाठी (Mahila Police job) अर्ज केला. मुळातच हुशार असणाऱ्या मल्लिकाची महिला पोलीस म्हणून निवड झाली. पूर्व गोदावरी (East Godavari) जिल्ह्यातील चक्रद्वारबंधम (Chakradwarabandham ) या ग्रामपंचायतीमध्ये तिची नियुक्ती झाली. तिथे गेल्यानंतर काही महिन्यांतच 29 वर्षीय मल्लिकानं महिलांच्या छेडछाडीसह एकूण 60 गुन्ह्यांची नोंद करण्याची कामगिरी केली. गावातील बेकायदेशीर कामांचा पर्दाफाश करत असताना तिला अनेकदा धमक्या मिळाल्या. मात्र, तिनं या धमक्यांना न घाबरता काम सुरू ठेवलं. मल्लिकानं गावातील पाच बालविवाह (child marriages) थांबवले असून गावकऱ्यांमध्ये कोविड जनजागृतीही केली. तिच्या कामामुळे वरिष्ठांवरदेखील प्रभाव पडला.

…म्हणून भारतात वाढतंय बेरोजगारीचं प्रमाण? कंपन्यांमध्ये चीनसारखं वर्क कल्चर

‘आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कधीकधी ऐषोआरामी आयुष्य आणि नोकरीसारख्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. आपल्या अंगावर कुठलीही एखादी सरकारी वर्दी असावी, हे माझं ध्येय होतं. पोलिसांची ड्युटी करण्यात एक वेगळाच चार्म आहे. याशिवाय मी पैशाला सर्वस्व मानत नाही. गावातील लोकांची सेवा करण्यातही समाधान मिळतं. त्यामुळे कमी पगार मिळत असूनही मी महिला पोलिसाची नोकरी करते’, असं मल्लिका म्हणते. माधापूरमधील ऐषोआरामी जीवन सोडून चक्रद्वारबंधमसारख्या खेड्यात येणं आणि ग्रामस्थांमध्ये राहणं कठीण गेलं. सुरुवातीच्या काळात तर मी गावातील समस्यांकडं फारसं लक्षही दिलं नाही. नंतर मात्र, मी मन लावून काम केलं. मला राजानगरम पोलिसांचा (Rajanagaram police) पाठिंबा आहे, असंही मल्लिकानं सांगितलं. सध्या मल्लिका ग्रुप-1 आणि ग्रुप-2च्या पदांसाठीच्या परीक्षेची तयारी करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या