कटिहार, 11 डिसेंबर: सोशल मीडियावर (social media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बिहारचा ( BIHAR) आहे. बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या पिकांचं आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. बिहारमध्ये दरवर्षी पहिल्या पूरामुळे (floods) मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होते. पुराचा रेड झोन म्हटल्या जाणार्या अमदाबाद ब्लॉकच्या झब्बू टोला येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. जेथे सुधारित माध्यमिक शाळेच्या झब्बू टोलाच्या दोन खोल्या गंगेच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. सुदैवानं विद्यार्थी शाळेत उपस्थित नव्हती म्हणून मोठी जीवितहानी टळली आहे. हेही वाचा- Omicron व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस एकमेव पर्याय?, WHO म्हणत… हे दृश्य खूपच अंगावर काटा आणणारं आहे. नदीच्या काठावर बांधलेल्या शाळेचे पीलर कोसळल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यादरम्यान हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी जमली होती. एनडीटी टीव्हीनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
त्याचवेळी काही लोक आसपासच्या गावकऱ्यांना दूर जाण्यास सांगत आहेत. हेही वाचा- मधुचंद्र होताच नवऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, उध्वस्त झालं नववधूचं आयुष्य गेल्या रविवारी बिहारमध्ये ‘जवाद’ (Jawad Cyclone) मुळे मुसळधार पाऊस झाला. गेल्या आठवड्यापर्यंत देशाच्या विविध भागात पाऊस सुरूच होता. यावर्षी बिहार