JOIN US
मराठी बातम्या / देश / RBIमध्ये 6 महिन्यात दुसरा राजीनामा; विरल आचार्य यांनी पद सोडलं! Viral Acharya | RBI | Deputy Governor

RBIमध्ये 6 महिन्यात दुसरा राजीनामा; विरल आचार्य यांनी पद सोडलं! Viral Acharya | RBI | Deputy Governor

रिझर्व्ह बँक इंडिया (RBI)चे सर्वात कमी वयाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य (viral acharya) यांनी कार्यकाळ संपण्याच्या 6 महिने आधी राजीनामा दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 जून: रिझर्व्ह बँक इंडिया (RBI)चे सर्वात कमी वयाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य (viral acharya) यांनी कार्यकाळ संपण्याच्या 6 महिने आधी राजीनामा दिला आहे. आचार्य 23 जानेवारी 2017 रोजी या पदावर नियुक्त झाले होते. त्याचा कार्यकाळ 3 वर्षाचा होता. पण तो संपण्याच्या 6 महिने आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. फेब्रुवारी 2020मध्ये सीव्ही स्टार प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथे ते रुजू होणार होते. आचार्य यांनी आता या वर्षी ऑगस्टमध्येच अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बिझनेस स्ट्रडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, RBI पतधोरण निश्चित करण्याच्या बैठकीच्या काही महिने आधी त्यांनी राजीनामा दिला आहे. जुलै महिना संपण्याच्या काही दिवस आधीच आचार्य पद मुक्त होतील. आचार्य यांनी वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. राजीनाम्यासंदर्भात अधिक विचारले असता त्यांनी सांगितले की, शाळेत असताना माझ्या शिक्षकांनी सांगितले होते, जेव्हा तुमचे काम बोलते तेव्हा तुम्ही बोलण्याची गरज नसते.

गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी RBIचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आचार्य देखील राजीनामा देतील अशी चर्चा होती. उर्जित यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता. आचार्य यांच्या प्रमाणेच उर्जित यांनी देखील वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. उर्जित यांच्या राजीनाम्यानंतर शक्तिकांत दास यांच्याकडे गव्हर्नर पदाची जबाबदारी देण्यात आली होती. VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या