लग्न सोहळा आटपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची गाडी दरीत कोसळली, 14 जणांचा मृत्यू
चम्पावत, उत्तराखंड, 22 फेब्रुवारी : लग्नसोहळा (marriage ceremony) आटपून घरी परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला भीषण अपघात (accident) झाला आहे. गाडी दरीत कोसळल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. (14 people died) उत्तराखंडमधील टनकपूर-चम्पावत महामार्गावरील सुखीढांग-डांडामीनार मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. (Major accident in Uttarakhand, 14 people died after vehicle fall into gorge) अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने मदत-बचावकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 13 मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. गाडी खोल दरीत कोसळल्याने मृतदेहांची ओळख पटवण्यातही अडचण येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मॅक्स वाहन क्रमांक (यूके टीए 4712) या गाडीचा अपघात झाला आहे. या गाडीतून सर्व प्रवासी टनकपूर येथील पंचमुखी धरमशाला येथे लग्न सोहळा आटपून आपल्या घराकडे परतत होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. रात्री जवळपास 3 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाचा : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात नववधूसह 5 जणांचा मृत्यू अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व नागरिक हे ककनई येथील निवासी लक्ष्मण सिंह यांचा मुलगा मनोज सिंह याच्या लग्नसोहळ्यासाठी गेले होते. हा लग्नसोहळा आटपून सर्व नागरिक घरी परतत होते. मृतकांपैकी बहुतांश हे लक्ष्मण सिंह यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. 13 जणांचे मृतदेह पोलिसांनी दरीतून बाहेर काढले आहेत. सर्व 13 जणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मृतकांमध्ये चार महिला, एक पाच वर्षांची मुलीचा समावेश आहे. या अपघातात गाडी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. पीएमओने ट्विट करत म्हटलं, उत्तराखंडमधील चंपावत येथे झालेला अपघात ह्रदय पळवटून टाकणारा आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने करत आहेत.