उत्तर प्रदेश, 17 डिसेंबर: यूपीमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका गोष्टीवरुन वधू किंचाळली (screamed) आणि तिने लग्नास नकार दिला. नंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचलं. अलीगढमधील छर्रा भागातील सिरौली गावात एक लग्न होत होतं. लग्न सोहळ्यात वर पक्षाचंही जंगी स्वागत करण्यात आलं. स्टेजवर वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहारही घातला. त्यानंतर लग्नाच्या इतर विधींसाठी ते मंडपात पोहोचले. अचानक किंचाळली वधू मंडपात वधूला कुंकू भरण्याची विधीही पूर्ण झाली. मात्र कन्यादानाच्या वेळी मुलानं हळद लावण्यासाठी हात पुढे केल्यावर वधूनं आरडाओरडा केला आणि ती जोरजोरात किंचाळायला लागली. त्याच क्षणी वधूनं लग्नाच्या विधी पूर्ण करण्यास नकार दिला. कारण मुलाच्या एका हाताची तीन बोटं नव्हती. हेही वाचा- चाकूनं भोसकून गर्लफ्रेंडनं संपवलं Boyfriend ला, अशी लावली मृतदेहाची विल्हेवाट माहिती लपवल्याचा केला आरोप नवऱ्या मुलानं बोटं नसल्याची माहिती लपवून सर्वांना फसवल्याचा आरोप वधूने केला आहे. वधूच्या कुटुंबियांना याबाबतची काही माहिती नव्हती, असाही आरोप केला आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या मध्यस्थींना ओलीस ठेवण्यात आलं होतं. दोन्ही कुटुंबियांच्या लोकांमध्ये जोरदार मारामारी झाली आणि रात्रभर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच होत्या, कोणीही एकमेकांचं ऐकायला तयार नव्हतं. वधूविना परतली वरात यासंदर्भात वराच्या पक्षाचं म्हणणं आहे की, हाताच्या बोटांबाबत वधूच्या कुटुंबियांना सांगितलं होतं. लग्नाचा कार्यक्रम जवळपास पार पडला होता पण वधूनं पाठवणीस नकार दिला. या सर्व घटनेची माहिती पोलिसांनाही पोहोचली आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचले. गावप्रमुखाच्या उपस्थितीत या प्रकरणावर तोडगा निघाला आणि त्यानंतरही वराला वधूविना रिकाम्या वरातीनं परत जावं लागलं.