लखनऊ, 10 फेब्रुवारी: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी (UP Election) आज म्हणजेच गुरुवारी मतदान होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) पहिल्या टप्प्यातील मतदानाची (UP First Phase Election) सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यातील 58 विधानसभा मतदारसंघात 2.28 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. EPIC कार्डच्या जागी मतदार मनरेगा कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्टसह 12 प्रकारच्या ओळखपत्रांचा वापर करू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतदान होणाऱ्या जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा फाटा तैनात असेल. पहिल्या टप्प्यात राज्यातील 58 विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. त्यासाठी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून प्रचाराचे काम थांबवण्यात आलं. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बी.डी. राम तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 58 विधानसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. 623 उमेदवार रिंगणात पहिल्या टप्प्यात शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाझियाबाद, हापूर, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा येथे मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 2.27 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार रिंगणात आहेत. कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या विधानसभामध्ये मतदान? पहिल्या टप्प्यात शामली 4 विधानसभा जागा मुझफ्फरनगर 6 विधानसभा जागा बागपत 3 विधानसभा जागा मेरठ 7 विधानसभा जागा गाझियाबाद 5 विधानसभा जागा हापूड 3 विधानसभा जागा गौतम बुद्ध नगर 3 विधानसभा जागा बुलंदशहर 7 विधानसभा जागा अलिगडच्या 7 विधानसभा जागा मथुराच्या 5 विधानसभा जागा आग्राच्या 9 विधानसभा जागा उमेदवारांची सर्वाधिक संख्या मथुरेत, सर्वात कमी नागला येथे पहिल्या टप्प्यातील मतदानात 623 उमेदवार रिंगणात आहेत. मथुरा मतदारसंघातून सर्वाधिक 15 उमेदवार रिंगणात आहेत. अलीगढच्या नागला मतदारसंघातून किमान 5 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात 22783739 मतदार मतदान करणार आहेत. यूपीमध्ये मतदान उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्याची सुरुवात 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी मतदानाने होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला राज्यातील 55 जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी 20 फेब्रुवारीला, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि सातव्या टप्प्यात 54 जागांसाठी मार्चला मतदान होणार आहे. त्याचवेळी यूपी निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी येतील.