JOIN US
मराठी बातम्या / देश / 'भारत तोडणारा प्रमुख', 'TIME' मासिकाकडून मोदींचा वादग्रस्त उल्लेख

'भारत तोडणारा प्रमुख', 'TIME' मासिकाकडून मोदींचा वादग्रस्त उल्लेख

‘टाइम’ने ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच ‘भारताचा फुटरतावादी प्रमुख’ असा करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मे : आंतरराष्ट्रीय ‘टाइम’ मासिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कव्हर पेजवर स्थान दिलं आहे. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच ‘भारताचा फुटरतावादी प्रमुख’ असा करण्यात आला आहे. टाइम मासिकानं आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यामधून नरेंद्र मोदींच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्ष देणार का?’ या शीर्षकाखाली टाइमनं हा लेख प्रसिद्ध केला आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारतात हिंदू-मुस्लीम धृवीकरणाचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर टाइमने याबाबत केलेल्या भाष्यामुळे आता नवा वाद पेटला आहे. ‘टाइम’च्या या लेखानंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, टाइम मासिकाने 2015 मध्येही नरेंद्र मोदी यांना आपल्या कव्हर पेजवर स्थान दिलं होतं. मात्र तेव्हा मोदींबाबत या मासिकाने सकारात्मक हेडलाईन केल्याचं पाहायला मिळालं होतं. SPECIAL REPORT: राज ठाकरे इफेक्ट आणि अंतर्गत वाद, युतीच्या 16 जागा धोक्यात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या