हैदराबाद, 29 नोव्हेंबर : देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) भीती वर्तवली जात होती. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) ओमायक्रोन (Omicron) सारखा व्हेरिएंटटी माहिती समोर आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. या घडामोडी एकीकडे सुरु असताना तेलंगणा (Telangana) राज्यातून आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. तेलंगणाच्या एका शाळेत 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोरोनाची (Students Corona Positive) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्ग कल्याण विद्यालयातील 45 विद्यार्थीनींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे शाळेतील एका शिक्षकाचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. संगारेड्डी जिल्ह्याच्या डीएम आणि एचओ डॉ. गायत्री यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सर्वच विद्यार्थीनींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पण या बातमीमुळे तेलंगणा प्रशासनदेखील कामाला लागलं आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉनसारख्या नव्या अवतारामुळे आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे, अशी माहिती तेलंगणा सरकारने दिली आहे.
हेही वाचा : डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉन व्हेरिएंट 6 पट अधिक संसर्गजन्य! या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तेलगंणा राज्यात रविवारी (28 नोव्हेंबर) एकूण 135 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. या नव्या संख्येमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 6 लाख 75 हजार 614 वर पोहोचली आहे. तसेच 3989 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या सक्रीय रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी नव्या कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रशासन आगामी संकटाच्या पार्श्वभूमीवर कामाला देखील लागलं आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणावर भर दिला जातोय. हेही वाचा : दक्षिण आफ्रिका व्हेरिएंटचे नाव Omicron का ठेवलं गेलं? याचा चीनशी काय संबंध?
विशेष म्हणजे दोन दिवसांपू्र्वी अशीच एक घटना समोर आली होती. कर्नाटकच्या धारवाड येथील एसजीएम मेडीकल कॉलेजमध्ये एकाच आठवड्यात तब्बल 281 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे शुक्रवारी (26 नोव्हेंबर) एकाच दिवशी शाळेतील तब्बल 99 विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे या घटनेची दखल कर्नाटक सरकारलादेखील घ्यावी लागली. प्रशासनाने या शाळेपासून 500 मीटर अंतारावर असलेल्या सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत.