JOIN US
मराठी बातम्या / देश / मी बजेट सेशनला उपस्थित राहू शकत नाही, कारण... लोकसभा अध्यक्षांकडे खासदाराने मागितली पितृत्व रजा

मी बजेट सेशनला उपस्थित राहू शकत नाही, कारण... लोकसभा अध्यक्षांकडे खासदाराने मागितली पितृत्व रजा

बाळाचं संगोपन ही केवळ आईची जबाबदारी नाही. बाळाच्या संगोपन आणि जडणघडणीत आई आणि वडील या दोघांचं सारखंच दायित्व महत्वाचं आहे, असं सांगत TDP च्या या खासदाराने Paternity leave मागितली आहे.

जाहिरात

TDP MP Ram Mohan Naidu

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली,30 जानेवारी :  तेलगू देसम पार्टीचे नेते आणि श्रीकाकुलमचे खासदार राम मोहन नायडू किंजारापू (Ram Mohan Naydu) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांना पत्राव्दारे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान (Budget Seesion) मला नऊ दिवसांची पितृत्व रजा (Paternity Leave) मिळावी, अशी मागणी केली आहे. लवकरच माझी पत्नी प्रसूत होणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या दशकातील आणि कोरोनाकाळातील पहिला अर्थसंकल्प या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. मात्र महत्वाच्या कारणामुळे नायडू यांनी काही काळ अधिवेशनास अनुपस्थिती राहण्याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे परवानगी मागितली आहे. नायडू यांनी पत्रात म्हटले आहे, की मला हे सांगण्यास आनंद होतो की येत्या आठवड्यात मी आणि माझी पत्नी आमच्या नवजात बाळाचे स्वागत करू, अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे मी विनंती करतो की मला 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान नऊ दिवसांची पितृत्व रजा मिळावी. माझी पत्नी प्रसुती प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहे. बाळाच्या जन्मानंतर काही दिवस मला तिच्यासोबत राहणं आवश्यक आहे. ‘बालसंगोपन ही फक्त आईची जबाबदारी नाही’ बाळाच्या सुरुवातीच्या काळात त्याचे योग्य पालनपोषण आवश्यक आहे. यावर त्याचा सर्वांगीण विकास अवलंबून असतो, असंही ते म्हणतात. बाळाचं संगोपन ही केवळ आईची जबाबदारी नाही. बाळाच्या संगोपन आणि जडणघडणीत आई आणि वडील या दोघांचं सारखंच दायित्व महत्वाचं  आहे, असं सांगत त्यांनी रजा मागितली आहे.

हे देखील वाचा -  राम मंदिर उभारणीसाठी मुस्लीम समाज सरसावला; मुंबईतील अभियानात दान केला मोठा निधी

संबंधित बातम्या

आपल्या संसदेतील ट्रॅक रेकाॅर्डचा तपशील देत त्यांनी संसदेत चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या तासांना नियमित हजर असतो, असे श्री. बिर्ला यांच्या निर्देशनास आणून दिले. संसदेतील घडामोडी आणि चर्चांबाबत स्वतः अपडेट ठेवण्यासाठी मी अधिवेशन फाॅलो करेल तसेच 11 फेब्रुवारीपासून लोकसभेत पुन्हा उपस्थित राहिन, माझी ही विनंती श्री. बिर्ला मान्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करुन नायडू यांनी या पत्राचा समारोप केला आहे. मात्र त्यांनी हे पत्र लोकसभा अध्यक्षांना नेमके कधी लिहिले आहे, याचा उल्लेख पत्रावर करण्यात आलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या