नवी दिल्ली, 11 एप्रिल : काही मुला-मुलींना शिक्षणात खास रस नसतो. पण तरीही आपल्या आवडत्या क्षेत्रात, मेहनतीने ते यशस्वी होतात. अशीच कहानी निखिल कामत यांची आहे. ट्रॅडिशनल शिक्षणात मन लागत नसल्याने, त्यांनी शाळा बुडवून चेस खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या 14 व्या वर्षी मित्रासोबत मिळून जुने फोन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. याबाबत त्यांच्या आईला समजल्यानंतर, तो व्यवसायही बंद झाला. त्यानंतर शाळेनेही त्यांच्यावर परीक्षा देण्यास बंदी घातल्यानंतर, 8000 रुपये महिना कॉल सेंटरमध्ये नोकरी सुरू केली. त्यानंतर निखिल (Nikhil kamath) यांनी आपल्या मोठ्या भावासोबत नितिन कामतसोबत (Nitin Kamath) ब्रोकरेज फर्म जेरोधाची सुरुवात केली आणि आता निखिल कामात देशातील सर्वात युवा अब्जाधिश ठरले आहे. ऑनलाईन ब्रोकरेज फर्म जेरोधाचे (Zerodha) को-फाउंडर निखिल कामत यांनी आपली कहाणी ह्युमन्स ऑफ बॉम्बेसह (Humans of Bombay) शेअर केली आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत निखिल कामत यांनी त्यांचे वडिल बँकेत नोकरी करत असल्याचं सांगितलं. त्यांची बँगलोरला ट्रान्सफर झाली. शालेय अभ्यासात निखिल यांचं मन लागत नव्हतं. ते शाळा सोडून बाहेर चेस खेळत बसायचे. 14 व्या वर्षी एका मित्रासोबत जुने फोन खरेदी-विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला, तोच त्यांचा पहिला व्यवसाय होता. परंतु या व्यवसायबाबत त्यांच्या आईला समजल्यानंतर त्यांनी सर्व फोन टॉयलेटमध्ये फ्लश केले आणि त्यांचा हा पहिला व्यवसाय बंद झाला. बोर्ड परीक्षांपूर्वी अटेंडेंन्समुळे निखिल यांना शाळेने परीक्षा न देण्याबाबत सांगितलं आणि त्यांच्या आई-वडीलांना शाळेत बोलावलं. त्यानंतर निखिल यांनी शाळाचं सोडली. त्यांच्या आई-वडीलांनी असं कोणतंही काम करू नको, ज्याने आमची मान खाली जाईल, असं त्यावेळी सांगितलं होतं.
शाळेतून ड्रॉपआउट झाल्यानंतर, पुढे काय करायचं काही समजतं नव्हतं. त्यानंतर त्यांनी बनावट बर्थ सर्टिफिकेट बनवून 17 व्या वर्षीच एका कॉल सेंटरमध्ये 8000 रुपयांवर नोकरी सुरू केली. ते कॉल सेंटरमध्ये संध्याकाळी 4 ते रात्री 1 पर्यंत काम करायचे. यादरम्यान 18व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा शेअर बाजारात पैसा लावला आणि त्यांना अनेक गोष्टींची माहिती मिळाली. त्यांच्या वडिलांनी त्यांना काही पैसे दिले आणि त्यातच मॅनेज करण्याचं सांगितलं. निखिल यांनी कॉल सेंटरच्या मॅनेजरला शेअर बाजारात इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार केलं आणि मॅनेजरचे पैसेही निखिल यांनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले.
निखिल कामत यांनी सांगितलं की, कॉल सेंटरमध्ये आपल्या शेवटच्या वर्षात ते एकही दिवस ऑफिसला गेले नाही पण त्यांना सॅलरीसह इन्सेंटिवही मिळत होता, कारण त्यावेळी ते आपल्या संपूर्ण टीमचे पैसे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करुन सर्वांना चांगले रिटर्न्स मिळवून देत होते. 2010 मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि आपल्या भावासोबत Zerodha ची सुरुवात केली. निखिल कामत यांनी आपल्या भावासोबत मिळून एक ऐसेट मॅनेजमेंट कंपनी True Beacon ची सुरुवात केली आहे. 2020 मध्ये फोर्ब्सने या दोन्ही भावांना भारताच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या लिस्टमध्ये सामिल केलं आहे.