नवी दिल्ली, 01 जुलै : पासपोर्टच्या वादावरून ट्विटरवर सुक्षमा स्वराज यांना ट्रोल करण्याचं सत्र काही संपता संपत नाही आहे. शनिवारी एका ट्विटर युजरने सुषमा यांचे पती स्वराज कौशल यांना ट्विट केलं**.** त्यात भाजप आणि परराष्ट्र मंत्री यांच्यावर आरोप लावत सुषमा घरी आल्यानंतर त्यांना मारा आणि समज द्या की मुस्लिम लोक भाजपला कधीही मतदान करणार नाहीत.
यावर स्वराज कौशल यांनी त्या ट्विटचा स्क्रिनशॉट काढून तो पोस्ट केला. त्यात असं लिहलं होतं की, ‘आज रात्री जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्यांना मारा आणि समज द्या की मुस्लिमांमध्ये मतभेद करू नये. मुस्लिम लोक भाजपला मतदान नाही करणार.’
स्वराज यांनी शेअर केलेलं हे ट्विट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील लाईक केलं आहे. त्याचबरोबर असं ट्विट करणाऱ्या मुकेश गुप्ताचं आणखी एक ट्विट सुषमा यांनी लाईक केलं आहे. त्यात त्याने लिहलं आहे की, ‘काही ना काही करून सुषमा स्वराज यांना सुधारायला हवं. त्यांना हे दाखवून द्यायला हवं की मुस्लिम त्यांना निवडूण देणार नाहीत. गव्हर्नर हा केवळ तुम्ही करू शकता. त्यामुळे पुढे चला, त्यांना फिक्स करा. करोडो भारतीयांचे आशिर्वाद तुम्हाला मिळतील.’
गडचिरोलीत कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकीत 7 जण ठार, 5 जखमी