पटणागड, 12 नोव्हेंबर : ओडिशाच्या बलांगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. एका घरातून एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 4 मुलेही आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत आणि मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू आहे. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या हे अद्याप पोलिसांना स्पष्ट करता आले नाही आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पटणागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सानरापाडा गावात बुलू जानी (50), त्यांची पत्नी ज्योती (48) आणि त्यांची दोन मुलं आणि दोन मुली यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मुलांचे वय दोन ते 12 वर्षे असल्याचे सांगितले आहे. पटणागड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रियंका राऊत्र यांच्या म्हणण्यानुसार हा खून की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेला नाही आहे. ते म्हणाले की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. संपूर्ण घराचा शोध घेतला जात आहे जेणेकरून घटनेची कारणं शोधला येतील. वाचा- SHOCKING! नोकरी करते म्हणून चाकूनं काढले डोळे, झाडली गोळी; पोलिसावर क्रूर हल्ला
वाचा- खळबळजनक! विडी दिली नाही म्हणून बापलेकाने मिळून केली हत्या, आरोपी फरार तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोकांनी बरेच दिवस घर आतून बंद असल्याचे सांगितल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली. काहींनी घर उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र घर लॉक असल्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलवलं. वाचा- अहमदनगरमध्ये भर-रस्त्यात गोळ्या झाडून हत्या, न्यायालयाने आरोपींना सुनावली शिक्षा घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी घरातच 6 मृतदेह आढळून आले. तपास अधिकारी म्हणाले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोरंजन प्रधान म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.