मुंबई, 17 जुलै : भाजपकडून नुकतंच उपराष्ट्रपतीच्या पदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला. भाजपकडून पश्चिम बंगालचे सध्याचे राज्यपाल जगदीप धनकर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर आज विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपदासाठी उमेदवार जाहीर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत घोषणा केली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी UPA डून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. उपराष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ बंगल्यावर विरोधी पक्षांची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी इतर नेत्यांसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत यूपीएचे उमेदवार जाहीर केला. “आम्ही आज अनेक विरोधी पक्षातील नेत्यांची चर्चा केली. विरोधी पक्षाच्या वतीने एक उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्गरेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचं सर्वानुमते ठरलं आहे. मार्गारेट अल्वा यांनी राज्यपाल, खासदार आणि महाराष्ट्राच्या प्रभारी म्हणून देखील काम केले आहे. सर्व विरोधी पक्षानी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज उपस्थित सर्व पक्षानी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.यावेळी सर्व विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहेत. जवळपास 17 पक्ष आज उपस्थित होते”, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. ( अमरावतीत भाजपच्या आमदार-खासदारात शीतयुद्ध, मतभेदांचं टोक कोणत्या दिशेला जाणार? ) दरम्यान, दीर्घकाळ काँग्रेसशी संबंधित असलेल्या मार्गारेट अल्वा सद्या राजकारणात सक्रिय नाहीत. त्या राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री राहिलेल्या आहेत. अल्वा या मूळचा कर्नाटकच्या आहेत. मार्गारेट अल्वा यांचे सासू-सासरे देखील राज्यसभेत होते. शरद पवार यांच्या समाजवादी कॉंग्रेसमध्ये देखील त्यांचा समावेश होता. अल्वा यांच्या रुपात या निवडणुकीत दक्षिणात्य महिला उमेदवार आहेत. त्या धार्मिकदृष्ट्या विचार केला तर ख्रिश्चन आहेत. पण त्यांना दक्षिणेतील सर्वाधिक पक्ष पाठींबा देण्याची शक्यता. आज 17 विरोधी पक्षाचा पाठींबा. दरम्यान, आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाची भूमिका गुलदस्त्यात आहे. शरद पवारांच्या घरी बैठकीला कोणकोणते नेते उपस्थित? काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश राष्ट्रवादीकडून शरद पवार द्रमुक कडून तिरुची शिवा टीआरएसकडून केशवराव आणि नमो नागेश्वर राव शिवसेनेकडून संजय राऊत सीपीएमकडून सीताराम येचुरी सीपीआय ते डी राजा राजदकडून ए.डी सिंह समाजवादी पक्षाकडून राम गोपाल यादव व्हीसीके कडून थिरुमावल्लवम आणि सुवेंकटेसन डी एम डी के कडून वायको