JOIN US
मराठी बातम्या / देश / Twitter वर #Reject_Zomato हॅशटॅग ट्रेंड, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Twitter वर #Reject_Zomato हॅशटॅग ट्रेंड, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

एका ग्राहकाने तक्रार केल्यानंतर कंपनी वादात अडकली आहे. ट्विटरवर ग्राहकाने एक स्क्रिनशॉट शेअर केल्यानंतर आता Zomato ने जाहीर माफी मागितली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : भारतातील आघाडीची फूड डिलीव्हरी कंपनी Zomato सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे. एका ग्राहकाने तक्रार केल्यानंतर कंपनी वादात अडकली आहे. कंपनीच्या एका एक्झिक्युटिव्हसोबत ग्राहकाने केलेल्या चॅटचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला. #Reject_Zomato हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला. त्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर विकाश (Vikash) नावाच्या ग्राहकाने स्क्रिनशॉट शेअर केल्यानंतर आता Zomato ने जाहीर माफी मागितली आहे. झोमॅटो रिजेक्ट करू नका अशा आषयाची सविस्तर पोस्ट करत कंपनीने घटनेबाबत निवेदनासह माफी मागितली आहे.

पूल कोसळत असताना समोरून आला दुचाकीस्वार अन्… अंगावर काटा आणणारा VIDEO

काय आहे प्रकरण? सोमवारी तमिळनाडूतील विकाश नावाच्या एका ग्राहकाने झोमॅटोवर काही स्क्रिनशॉट शेअर केले. त्यांना ऑर्डरमध्ये एक वस्तू कमी आली होती. त्यामुळे त्यांनी त्याचे पैसे परत मागितले. त्यासाठी त्यांनी एक्झिक्युटिव्हला हॉटेलमध्ये याबाबत चौकशी करण्यास सांगितलं. परंतु भाषेच्या अडथळ्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधता आला नाही. यावर झोमॅटोच्या एक्झिक्युटिव्हने त्या ग्राहकाला हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे ती सर्वांनाच आली पाहिजे असं म्हटलं आणि रिफंड करण्याचं नाकारलं. तसंच, ग्राहकावर ते खोटं बोलत असल्याचेही आरोप केले. त्यावर ग्राहकाने जर झोमॅटो तमिळनाडूमध्ये उपलब्ध असेल, तर त्यांना ती भाषा समजण्यसााठी तमिळ भाषिक व्यक्तीची नेमणूक केली पाहिजे असं म्हटलं.

जाहिरात

याच संभाषणाचे स्क्रिनशॉट त्या ग्राहकाने ट्विटरवर शेअर केल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून आता कंपनीने ग्राहकाची जाहीर माफी मागितली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या