JOIN US
मराठी बातम्या / देश / पंजाब निवडणुकीपूर्वी राम रहीम 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर; विरोधकांनी सरकारला घेरलं

पंजाब निवडणुकीपूर्वी राम रहीम 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर; विरोधकांनी सरकारला घेरलं

हत्या आणि लैंगिक शोषण प्रकरणी गेल्या 4 वर्षांपासून तुरुंगात असलेला गुरमीत राम रहीम 21 दिवसांच्या फरलोवर तुरुंगातून बाहेर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुरुग्राम 08 फेब्रुवारी : रोहतकच्या सुनारिया तुरुंगात खून आणि लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जन्मठेपेची आणि 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमला (Gurmeet Ram Rahim) आज 21 दिवसांची रजा (Ram Rahim gets 21days Furlough) मिळाली. त्यानंतर राम रहीमला सुनरिया तुरुंगातून गुरुग्राम दक्षिण शहरातील त्याच्या तंबूत नेण्यात आलं. मात्र, आरोपी बाबाच्या तुरुंगातून बाहेर येण्याचं पंजाब निवडणुकीशी कनेक्शन जोडलं जात आहे. पंजाबमध्ये निवडणुका आहेत आणि बाबाचा पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. हत्या आणि लैंगिक शोषण प्रकरणी गेल्या 4 वर्षांपासून तुरुंगात असलेला गुरमीत राम रहीम 21 दिवसांच्या फरलोवर तुरुंगातून बाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गुरमीत राम रहीमला थेट त्याच्या गुरुग्राममधील दक्षिण शहरातील आश्रमात आणण्यात आलं. आश्रमात पोहोचण्यापूर्वी गुरूग्राम पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पंतप्रधान मोदींनंतर पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक!

गुरमीत राम रहीम आश्रमात आल्यानंतर त्याचे अनुयायी आणि कुटुंबीय अनेक वाहनांतून येथे पोहोचले. गुरमीत राम रहीमसोबत त्याची आई, पत्नी आणि मुलंही या आश्रमात आहेत. राम रहीमच्या या फरलोमुळे पत्रकार छत्रपतींचे पुत्र अन्सुल यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पंजाब आणि पश्चिम यूपीमधील निवडणुकीत फायदा घेण्यासाठी सरकारने राम रहीमला तुरुंगातून बाहेर सोडल्याचा आरोप अन्सुल यांनी केला आहे. त्याचवेळी ते म्हणाले की, ते हे प्रकरण उच्च न्यायालयात नेणार आहेत, जेणेकरून राम रहीमची फरलो रद्द करता येईल.

CM योगींना जीवे मारण्याची खुलेआम धमकी; लेडी डॉनचं ट्विट व्हायरल, पोलीस सतर्क

डेरा सच्चा सौदा हरियाणातील सिरसा जिल्ह्यात आहे. पंजाबमधील मालवा भागातील सुमारे 69 जागांवर त्याचा प्रभाव आहे. गुरमीत राम रहीमच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुनारिया तुरुंगाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. हरियाणा तुरुंग विभागाने सिरसा डेरा प्रमुख राम रहीमच्या 21 दिवसांच्या फरलो (रजा) अर्जाला आधीच मंजुरी दिली होती. रोहतक आयुक्तांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्याला तुरुंगातून बाहेर आणण्यात आलं. राम रहीमला फरलो मिळाल्याबद्दल बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले, सर्व समाजाला माहिती आहे की फरलोचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. हा निव्वळ योगायोग आहे आणि प्रत्येकाला याबद्दल माहिती आहे. तीन वर्षे तुरुंगवास पूर्ण केल्यानंतर कोणताही कैदी त्यासाठी अर्ज करू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या