नवी दिल्ली, 25 सप्टेंबर: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी नवीन मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या निवडीसंदर्भात काँग्रेस हायकमांडची भेट घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात दिल्लीत शुक्रवारी उशीरा रात्रीपर्यंत ही बैठक पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चन्नी यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या नावांची यादी फायनल करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंजाब मंत्रिमंडळाला (Punjab Cabinet) हिरवा कंदील दिला आहे. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी राष्ट्रीय राजधानीतून परतल्यानंतर काही तासांनी, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने त्यांना पुन्हा दिल्लीला बोलावून घेतलं. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांची ही तिसऱ्यांदा दिल्ली भेट होती. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर विचारमंथन करण्यासाठी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत आणि काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन उपस्थित होते. …म्हणून मुंबईतील 40 टक्के लोकसंख्या कोरोनापासून सुरक्षित मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब सूत्रांनी सांगितले की, चन्नी यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. अमरिंदर सिंग यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या मंत्र्यांना या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत ब्रह्म मोहिन्द्रा, राणा गुरजीत, मनप्रीत बादल, तृप्त राजिंदर बाजवा, सुखबिंदर सिंह सरकारिया, अरूणा चौधरी, रजिया सुल्ताना, डॉ राज कुमार वेरका, भारत भूषण आशु, विजय इंदर सिंगला, गुरकीरत कोटली यांची नावे आहेत. IPL 2021, DC vs RR: पंत टाकणार सेहवागला मागं, दिल्लीसाठी करणार सर्वात मोठा रेकॉर्ड! अमरिंदर सिंग मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांना स्थान मिळालं नाही याशिवाय राजा अमरिंदर वडिंग, संगत सिंह गिलजियां, काका रणदीप सिंह, परगट सिंह, कुलजीत सिंह नागरा इत्यादी नावं अंतिम झाली आहेत. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले बलबीर सिंह सिद्धू, राणा गुरमीत सोढी, गुरप्रीत सिंग कांगड, साधू सिंह धर्मसोत आणि सुंदर शाम अरोरा यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.