पंजाब, 13 नोव्हेंबर: यावर्षी 26 जानेवारीला दिल्लीत (Delhi) ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेल्या 83 आरोपींना पंजाब सरकारनं (Panjab Government) आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Cm Charanjit Singh Channi) यांनी प्रत्येक आरोपीला दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही घटना 26 जानेवारीची आहे. जेव्हा संयुक्त किसान मोर्चानं दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. त्याच दिवशी लाल किल्ल्यावर केसरी ध्वज लावण्यात आला होता. यानंतर काही शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर पोहोचून तेथे केसरी ध्वज लावला होता. सीएम चन्नी म्हणाले, केंद्रीय कृषी सुधारणा कायद्यांविरोधात सरकारनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हेही वाचा- रेल्वे प्रवाशांनो, उद्या घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉकचे ‘हे’ वेळापत्रक वाचा मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांचं ट्विट चरणजित सिंह चन्नी यांनी ट्विट केलं की, ‘तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माझ्या सरकारच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार करत आम्ही 26 जानेवारी 2021 रोजी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 83 लोकांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत अशा वेळी चन्नी यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेस सरकारच्या या हालचालीमुळे नवे राजकीय युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. हेही वाचा- IND vs NZ: 659 विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सची टीम इंडियात निवड नाही, VIDEO शेअर करत साधला निवड समितीवर निशाणा लाल किल्ल्यावर हिंसाचाराचे प्रकरण घडले, तेव्हा संयुक्त किसान मोर्चानं त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. कारण, मोर्चाच्या ट्रॅक्टर रॅलीचा कार्यक्रम लाल किल्ल्याकडे नव्हता. याप्रकरणी त्यांनी पंजाबी अभिनेता दीप सिध्दूला जबाबदार धरण्यात आलं होतं. यापूर्वी पंजाब विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेस सरकारनं केंद्राचे तिन्ही कृषी कायदे रद्द केले होते.