JOIN US
मराठी बातम्या / देश / मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी Congressच्या सर्वेक्षणात पंजाबचा खेळ पलटला, 'या' नावावर शिक्कामोर्तब होणार?

मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी Congressच्या सर्वेक्षणात पंजाबचा खेळ पलटला, 'या' नावावर शिक्कामोर्तब होणार?

पंजाबमध्ये मुख्यमंत्री चेहरा निवडण्यासाठी CM face in Punjab)काँग्रेसनं सुरू केलेल्या सर्वेक्षणात चन्नी आघाडीवर असल्याचे पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांचं म्हणणं आहे.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदीगड, 03 फेब्रुवारी: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना पुढील आठवड्यात पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly elections) काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं जाऊ शकतं. पंजाबमध्ये मुख्यमंत्री चेहरा निवडण्यासाठी (CM face in Punjab) काँग्रेसनं सुरू केलेल्या सर्वेक्षणात चन्नी आघाडीवर असल्याचे पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांचं म्हणणं आहे. सूत्रांनी सांगितलं की, उमेदवार, कार्यकर्ते आणि पक्षाच्या खासदारांची मते नोंदवली जात आहेत जेणेकरुन चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यात मुख्यमंत्री चेहऱ्यावरील लढत टाळता येईल. स्वयंचलित कॉल सिस्टमद्वारे मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर त्यांचं मत जाणून घेण्यासाठी पक्ष सामान्य जनतेलाही कॉल करत आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत सुमारे दीड कोटी लोकांना यंत्रणेद्वारे फोन करण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे. ब्लॉक अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि सर्व उमेदवारांचे मत घेऊन पक्षाचे समन्वयक लवकरच पक्षाची सूत्रे हाती घेण्यासाठी पोहोचत असल्याचं सांगण्यात येत आहे. पंजाब के मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी कांग्रेस का सीएम चेहरा हो सकते हैं.(फाइल फोटो) दरम्यान, पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा बनवण्यासाठी दोन्ही नेत्यांचा अभिप्राय देण्यासाठी पक्षाच्या राज्यसभा आणि पंजाब लोकसभा खासदारांशीही संपर्क साधला जात आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ सदस्याने मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पक्ष हे सर्व प्रयत्न करत आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असावी आणि सर्वेक्षणात जो हरेल त्याने कोणत्याही प्रकारे निकालाला विरोध करू नये, असे मत आहे. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की चन्नी आणि सिद्धू दोघांनाही सर्वेक्षणाचा निर्णय स्वीकारावा लागेल. कारण त्यांनी राहुल गांधींसमोर ते मान्य केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चन्नी आपल्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत, मात्र पक्षाला पुराव्यासह ते जाहीर करण्यासाठी पुरेसा वेळ घ्यायचा आहे, जेणेकरून सिद्धूच्या रागावर नियंत्रण ठेवता येईल. सर्वेक्षणात चन्नी आणि सिद्धू यांच्याबाबतच प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे शर्यतीत दुसरा चेहरा नसल्याचं पक्षाकडून स्पष्ट केलं जात आहे. काँग्रेसच्या या सर्वेक्षणात पंजाबी भाषेतील तीन प्रश्न असून त्यांना त्यांच्या पसंतीच्या पर्यायाचे बटण दाबून IVR वर आपलं मत देण्यास सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या