JOIN US
मराठी बातम्या / देश / लक्ष्य गुजरात निवडणूक! प्रशांत किशोर कोणासाठी करणार काम? या बड्या नेत्यांची घेतली भेट

लक्ष्य गुजरात निवडणूक! प्रशांत किशोर कोणासाठी करणार काम? या बड्या नेत्यांची घेतली भेट

गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election) काँग्रेस पक्षाच्या प्रचारावर काम करण्यासाठी राहुल आणि प्रशांत किशोर यांच्यात बोलणी झाल्याचं मानलं जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 26 मार्च : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी शुक्रवारी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) वाड्रा यांची भेट घेतली. काँग्रेसच्या दोन नेत्यांनीही या भेटीला दुजोरा दिला आहे. मात्र, या बैठकीबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election) काँग्रेस पक्षाच्या प्रचारावर काम करण्यासाठी राहुल आणि प्रशांत किशोर यांच्यात बोलणी झाल्याचं मानलं जात आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेस नेतृत्व आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले होते. त्यानंतर काँग्रेसने प्रशांत किशोर यांचे माजी सहकारी सुनील कानुगोलू यांच्याशी निवडणूक प्रचारासाठी करार केला, तर प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. कानुगोलू यांनी गेल्या महिन्यात पक्षासोबत काम करण्यास सुरुवात केली, तर किशोर यांची काँग्रेससोबत काम करण्याची शक्यता धूसर दिसत होती. योगींच्या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लीम चेहरा; भाजपनं असं जुळवून आणलंय जातींचं गणित या दोघांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी सिटीझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स (CAG) संस्थेचा भाग म्हणून एकत्र काम केलं होते. त्यानंतर किशोर त्यांच्या मार्गावर गेले, तर कानुगोलू भारतीय जनता पक्षासोबत काम करत राहिले, तेव्हा भारतीय जनता पक्षाने 2017 च्या उत्तर प्रदेश निवडणुका जिंकल्या होत्या. कानुगोलू आणि किशोर एकत्र काम करू शकतील की नाही या प्रश्नावर काँग्रेस नेतृत्वाला आता काम करायचं आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, याला दुजोरा देणार्‍या काँग्रेसच्या दोन सूत्रांनी सांगितलं की, काँग्रेस हा या दोघांसाठी काम करण्यासाठी मोठा पक्ष आहे. कानुगोलू हे प्रामुख्याने पुढील वर्षी होणाऱ्या कर्नाटक निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत आहेत, परंतु निवडणुकीची सर्व रणनीती पाहणाऱ्या एका नवीन सेलचे अध्यक्षपद त्यांच्याकडे असेल अशी अपेक्षा आहे. प्रशांत किशोर यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशात पक्षाचा मुद्दा उपस्थित केल्यास त्यांना कोणताही आक्षेप नाही, असे कानुगोलू यांनी गांधी कुटुंबीयांना सांगितल्याचं कळतं. Birbhum Violence: ‘बंगालमधून लोक पळ काढतायेत…’; सभागृहातच भाजप महिला खासदाराच्या अश्रूंचा बांध फुटला सूत्रांनी सांगितलं की, कर्नाटकात आम्हाला खूप आत्मविश्वास वाटत होता, पण नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तो कमी झाला आहे. ज्या राज्यात निवडणुका झाल्या त्यापैकी एकाही राज्यात विजय मिळवता आला नाही. उत्तराखंडसारख्या ठिकाणी भाजपने यशस्वीपणे वापरलेले ध्रुवीकरण इतर राज्यातही प्रभावीपणे काम करेल, अशी भावना आहे. म्हणून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या