JOIN US
मराठी बातम्या / देश / Lakhimpur kheri Violence : 12 तासाच्या चौकशीनंतर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक

Lakhimpur kheri Violence : 12 तासाच्या चौकशीनंतर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक

आशिष मिश्रा उर्फ ​​मोनूच्या अटकेबद्दल (Ashish Mishra Arrested) माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आशिष घटनेबद्दल योग्य माहिती देत ​​नव्हता आणि तो तपासात सहकार्य करत नव्हता

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ10 ऑक्टोबर : लखीमपूर खीरी हिंसाचार (Lakhimpur kheri Violence) प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आणि संशयित आरोपी असलेल्या आशिष मिश्रा यांना पोलिसांनी अटक (Ashish Mishra Arrested) केली आहे. डीआयजी अतुल अग्रवाल यांनी आशिष मिश्राच्या अटकेची माहिती दिली आहे. आशिष मिश्रा उर्फ ​​मोनूच्या अटकेबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आशिष घटनेबद्दल योग्य माहिती देत ​​नव्हता आणि तो तपासात सहकार्य करत नव्हता. खून, अपघाती मृत्यू, गुन्हेगारी कट, हलगर्जीपणे ड्रायव्हिंग या कलमांखाली 12 तासांच्या चौकशीनंतर आशिषला अटक करण्यात आली. 2000 च्या नोटांवरील गांधींचे चित्र हटवा; काँग्रेस आमदाराची थेट मोदींकडे मागणी पोलिसांच्या चौकशीदरम्यान आशिष मिश्रा पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाहीत. आशिष घटनेच्या दिवशीचा 2:30 ते दुपारी 3:30 पर्यंतचा तपशील देऊ शकले नाही. डीआयजी उपेंद्र अग्रवाल म्हणाले की, आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाहीत, प्रश्नांची योग्य उत्तरे देत नाहीत, आम्ही त्यांना अधिकृतरीत्या अटक केली आहे. आता मेडिकल करून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. आशिष मिश्रा यांच्या अटकेची मागणी विरोधक सातत्याने करत होते. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनीही आशिषच्या अटकेची मागणी केली होती. दरम्यान, यूपी सरकारने या प्रकरणात पीडित पक्षाला कोणत्याही दबावाशिवाय न्याय देणार असल्याचं म्हटलं होतं. ‘दलित व्यक्ती चर्चमध्ये गेल्यास जात प्रमाणपत्र…’, HCचा महत्त्वपूर्ण निर्णय लखीमपूर हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेश सरकारने सर्व मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45-45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती. याशिवाय मृतांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीही देण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या