पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो - पीटीआय)
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशवासियांना संबोधित करणार आहेत. सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार असून नेमकी कोणती घोषणा करणार? कुठल्या विषयावर भाष्य करणार याकडे आता सर्व देशाचे लक्ष लागलेलं आहे. पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार असल्याची माहिती PMO कार्यालयाने ट्विट करुन दिली आहे. (PM Narendra Modi will address nation today)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमकं कोणत्या विषयावर भाष्य करणार आहेत याबाबत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, नुकताच भारताने 100 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे आणि ही मोहिम अद्यापही सुरू आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाष्य करुन वैद्यकीय यंत्रणांची पाठ थोपवण्याची शक्यता असून जनतेचेही कौतुक करणार असल्याचं बोललं जात आहे. फ्रंटलाईन वर्कर्सचे आभार 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं, भारताने इतिहास रचला आहे. हा लसीकरणाचा टप्पा पार केल्याबद्दल सर्व भारतवासियांचे अभिनंदन. आपले डॉक्टर्स, परिचारिका आणि ज्यांनी-ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्या सर्वांचे आभार. भारतानं ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा भारतातील कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचला आहे. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केवळ 279 दिवसांत हा विक्रम घडला आहे. भारतात दहा महिन्यांपूर्वी 16 जानेवारी 2021 या दिवशी लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर भारतानं हा विक्रम पूर्ण केला आहे. जगातल्या सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेतील हा मैलाचा दगड. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 जानेवारी 2021 रोजी ही देशव्यापी मोहीम सुरू केली होती. या वर्षभरात देशातल्या 944 दशलक्ष प्रौढांचं लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत यांपैकी 75 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. 31 टक्के नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. वाचा : 100 कोटींचा टप्पा गाठला; पुढे काय? मोदींचा महालसीकरणाचा रथ ओढणाऱ्या 6 सारथ्यांनी सांगितली योजना कुठल्या राज्यात सर्वाधिक लसीकरण? सर्वाधिक लसीकरण झालेल्या राज्यांच्या यादीत लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठ्या राज्यांचा समावेश आहे. सर्वाधिक लसीकरण उत्तर प्रदेश झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 12,21,60,335 डोस दिले गेले आहेत. तर महाराष्ट्रात 9,32,25,506 डोस देण्यात आले आहेत. तिसरा नंबर पश्चिम बंगालचा आहे. बंगालमध्ये आतापर्यंत 6,85,28,936 डोस देण्यात आले आहेत. तर गुजरातमध्ये 6,76,87,913 डोस देण्यात आले आहेत. या राज्यांत 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण देशातील काही राज्यांमध्ये 100 टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचं काम पूर्ण झालं आहे. यामध्ये सिक्कीम, गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, चंदीगढ, लक्ष्यद्वीप, दादरा नगर हवेली या राज्यांचा समावेश आहे.