JOIN US
मराठी बातम्या / देश / PM Narendra Modi : देशात कोरोना वाढला, पंतप्रधानांकडून तातडीची बैठक, मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Narendra Modi : देशात कोरोना वाढला, पंतप्रधानांकडून तातडीची बैठक, मोदी नेमकं काय म्हणाले?

देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, गृहसचिव, कॅबिनेट सचिव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 जानेवारी : देशात कोरोनाचा हाहा:कार सुरु आहे. कोरोनाबाधितांच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वोच्च सभागृह मानलं जाणाऱ्या संसदेपासून ते सुप्रीम कोर्टात कोरोनाने शिरकाव केला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, गृहसचिव, कॅबिनेट सचिव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. मोदी बैठकीत नेमकं काय म्हणाले? पुरेशा आरोग्य यंत्रणांची खात्री करा. कोरोनाचा विषाणू सतत विकसित होतोय. त्यामुळे नित्यनियमाने चाचण्या घ्या. विषाणू बदलत असल्याने लसीकरण, जिनोम सिक्वेन्सिंगसह वेगवेगळ्या औषधांबाबत सतत वैज्ञानिक संशोधन करणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सूचित केलं. प्रत्येक राज्यांमधील कोरोना परिस्थिती, तेथिल सुविधा आणि सार्वजनिक आरोग्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं. तसेच दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याशी संबंधित मार्गदर्शन करा, असंही पंतप्रधानांनी सूचित केलं. हेही वाचा :  प्रथमच बहुरंगी लढत, शिअद आणि काँग्रेसची मते अनेक पक्षांमध्ये विभागणार? पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. या आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींनी जिल्हा स्तरीय आरोग्य यंत्रणेला बळकट करण्याची सूचना केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व राज्यांशी समन्वय साधण्याची सूचना केली. तसेच लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच ज्या भागांमध्ये किंवा झोनमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत त्या झोनमध्ये लक्ष केंद्रीत करा. तिथे सतत निगराणी ठेवा. तसेच ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्या राज्यांना जी मदत लागेल ती मदत करा, अशीदेखील सूचना पंतप्रधान मोदींनी केली. संसदेतही कोरोनाचा शिरकाव दुसरीकडे, देशातील सर्वोच्च सभागृह मानल्या जाणाऱ्या संसदेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढतेय. त्याचेच पडसाद आता संसदेत बघायला मिळाले आहेत. संसदेत काम करणाऱ्या तब्बल 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. संसदेत कोरोनाचा अशाप्रकारे हाहा:कार उडाल्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या