नवी दिल्ली, 23 मार्च : पश्चिम बंगालमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकार अशा लोकांना नक्कीच शिक्षा करेल, अशी आशा पीएम मोदींनी व्यक्त केली आहे. ‘राज्य सरकार कारवाई करेल’ पंतप्रधान म्हणाले, ‘पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे झालेल्या हिंसक घटनेबद्दल मी दुख: व्यक्त करतो. मला आशा आहे की, बंगालच्या महान भूमीवर असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांवर राज्य सरकार नक्कीच कारवाई करेल. मोदींचं जनतेला आवाहन पीएम मोदी म्हणाले, ‘मी बंगालच्या जनतेलाही आवाहन करेन की, अशा घटना घडवणाऱ्यांना, अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देणार्यांना कधीही माफ करू नका.’ हे वाचा - ‘इतर राज्यांतही असं घडतं’ Birbhum Viloence वर ममतांचं वक्तव्य केंद्र पूर्ण मदत करेल पीएम मोदींनीही राज्य सरकारला आपल्या बाजूनं पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या वतीनं मी राज्याला आश्वासन देतो की, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी हवी ती मदत केली जाईल.’