नवी दिल्ली, 14 मार्च : तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचा प्लॅन करत आहात, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. सध्या एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यात रेल्वेने आपल्या सिस्टममध्ये काही मोठ्या बदलांची तयारी केल्याचा दावा केला जात आहे. या बदलानुसार, रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे 10 टक्के अधिक भाडं घेण्याचा दावा केला जात आहे. याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) या दाव्याची प्रत्यक्ष तपासणी केली. त्यानंतर ट्वीट करुन या दाव्यामागचं सत्य समोर आलं आहे. PIB ने आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं की, ‘काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेकडून 10 टक्के अधिक भाडं वसूल केलं जाऊ शकतं’. परंतु PIBFactCheck ने हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. ही केवळ रेल्वे बोर्डाला (Railway board) देण्यात आलेली सूचना होती असंही PIB कडून सांगण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा करण्यात आला की, बेडरोलचे 25 रुपये 60 रुपये करण्याची सूचना आली आहे. रेल्वे बोर्डच्या एका अधिकाऱ्याची ही सूचना टॉप-5 मध्ये ठेवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अधिकाऱ्याने रेल्वेला सांगितलं की, एसी कोचमध्ये दिल्या जाणाऱ्या बेडरोलचं भाडं गेल्या 15 वर्षापासून 25 रुपये आहे. परंतु आता ते भाडं 55 ते 60 रुपये केलं जावं अशी सूचना त्यांनी केली. परंतु PIB ने हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. रेल्वे विभागाचा अशाप्रकारचा कोणताही प्लॅन नाही. कोरोनाच्या या परिस्थितीत फेक न्यूज वेगाने व्हायरल होत असल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर पीआयबीने याबाबत स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळत सत्य सांगतिलं आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या व्हायरल दाव्याचं खंडण करत सरकाने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं.
तुम्हीही करू शकता फॅक्टचेक - जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.