JOIN US
मराठी बातम्या / देश / संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द, कोरोनामुळे केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द, कोरोनामुळे केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

कोरोना संसर्गाचा वाढता प्रकोपामुळे यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 डिसेंबर: कोरोना संसर्गाचा (Coronavirus) वाढता प्रकोपामुळे यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन (Parliament winter session) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले, देशभरात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं मत मांडलं होतं. त्याचबरोबर संसद भवनाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे आता जानेवारी 2021 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. हेही वाचा.. मुरडीनं मास्क घातला नाही, म्हणून कुटुंबाला विमानाच्या बाहेर काढलं! VIDEO संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हिवाळी अधिवेशन रद्द करण्याबाबत एक पत्रक देखील जारी केलं आहे. प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं, दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतीविषयक कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचं प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. Parliament Winter Session Cancelled: कोरोनामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द दरम्यान, दिवाळीनंतर देशात कोरोनाचा संसर्गा पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. दिल्लीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्ये दिवसागणित वाढत आहे. देशात सुमारे एक कोटींच्या जवळपास नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या देशात 3.35 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात कोरोनानं 1.43 लाखांहून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे. हेही वाचा… कोरोनाची लस घेऊच, पण या 4 साइड इफेक्ट्सचं काय करायचं? डॉक्टरांनी दिला इशारा दरम्यान, कोरोना लशींच्या ट्रायलचे आतापर्यंत अंतरिम परिणाम जारी करण्यात आले आहेत. या लशी जास्तीत जास्त 95 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, आता कोरोनाची 100 टक्के प्रभावी लस सापडली आहे. विशेष म्हणजे या लशीचं भारतातही ट्रायल सुरू आहे. ही लस म्हणजे रशियानं तयार केलेली  Sputnik V. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील अहवाल रशियानं जारी केला आहे. जो सकारात्मक असल्याचं समोर आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या