JOIN US
मराठी बातम्या / देश / 'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत

'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत

24 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi_) काश्मिरी नेत्यांची भेट घेणार (PM To Hold Meeting of Political Parties From Jammu Kashmir) आहेत. मात्र, या भेटीआधीच आता पाकिस्तानला चिंता लागल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 20 जून : 24 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi_) काश्मिरी नेत्यांची भेट घेणार (PM To Hold Meeting of Political Parties From Jammu Kashmir) आहेत. मात्र, या भेटीआधीच आता पाकिस्तानला चिंता लागल्याचं समोर आलं आहे. पाकिस्ताननं यावर बोलताना शनिवारी म्हटलं आहे, की काश्मीरच्या सध्याच्या भौगोलिक स्थितीबाबतच्या कोणत्याही बदलाला आमचा विरोध असेल. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यात असं म्हटलं गेलं आहे, की परराष्ट्रमंत्री मोहम्मद कुरैशी म्हणाले, की काश्मीरमध्ये कोणतीही अवैध पावलं उचलणं भारतानं टाळावं. पाकिस्तानचं हे विधान अशावेळी समोर आलं आहे, नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरच्या 14 राजकीय पक्षांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. 24 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीत राज्यातील विधानसभा निवडणुका घेण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते, असे बोलले जात आहे. याच गोष्टीमुळे पाकिस्तान विरोध करत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी असं म्हटलं आहे, की 5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने केलेल्या कारवाईला आम्ही तीव्र विरोध दर्शविला आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळासह अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर आपलं मत व्यक्त केलं. काय चाललंय काय? बंद फॅक्टरीचं विजेचं बिल 90 कोटी; आकडा पाहून मालक शॉक या बैठकीपूर्वी पाकिस्तानला किती चिंता वाटते आहे, याची कल्पना तुम्हाला यावरुनच येईल की पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांनाही काश्मीरसंदर्भात भारताच्या संभाव्य पावलांबद्दल इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीर वाद मिटवला तरच दक्षिण आशियात शांतता निर्माण होऊ शकते, असं पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे. यूएनएससीचा ठराव आणि काश्मीरमधील जनतेची इच्छा विचारात घेत हा वाद संपवता येतो, असंही ते म्हणाले. डेल्टा व्हॅरिएंट अधिक धोकादायक? 30 दिवसात दोनदा संसर्ग झाल्याने डॉक्टर हादरले! भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानला हे झोंबलं आहे. मात्र, हे प्रकरण आमचं अंतर्गत असून पाकिस्तानने अंतर्गत कामात हस्तक्षेप करू नये, असे भारताने बर्‍याचदा पाकिस्तानला सांगितले आहे. जम्मू-काश्मीर ही देशातील अंतर्गत बाब आहे आणि हा वाद सोडविण्यास आम्ही सक्षम आहे, असेही आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये भारताने आपलं मत मांडताना म्हटलं आहे. दहशतवाद आणि हिंसक कारवाया थांबविण्यासाठी शेजार्‍यांनी कठोर पावले उचलली तरच शेजारी देशाशी चांगले संबंध निर्माण होतील, असेही भारताने पाकिस्तानला सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या