मुंबई 12 ऑगस्ट: महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहारमध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्या तर मतदार कोणाला आपला कौल देतील, याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. यात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातून युपीएला 30 तर एनडीएला फक्त 18 जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे. तर बिहारमधील चित्र मात्र वेगळं आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमधल्या सत्तानाट्यानंतरही भाजपला फटका बसेल पण एनडीएलाच बहुमत मिळेल, असं या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. आज निवडणुका झाल्या तर निकाल काय? धक्कादायक सर्व्हे वाढवणार फडणवीस-शिंदेंचं टेन्शन 1 ऑगस्टपर्यंत लोकसभा निवडणुका झाल्या असत्या तर एनडीएला 543 पैकी 307 जागा मिळाल्या असत्या, तर युपीएला 125 आणि इतर पक्षांना 111 जागा मिळाल्या असत्या. बिहारच्या सत्तांतरानंतर मात्र हे चित्र बदललं आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांनी साथ सोडल्यानंतर भाजपच्या 21 जागा कमी होत आहेत. एनडीएला आज निवडणुका घेतल्या तर 286 आणि युपीएला 146 जागा मिळतील. मुड ऑफ द नेशन जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे सी-व्होटरने 1,22,016 जणांची मतं जाणून घेतल्याचा दावा केला आहे. फेब्रुवारी 2022 ते 9 ऑगस्ट 2022 ही तारीख या सर्व्हेसाठी घेण्यात आली, कारण नितीश कुमार यांनी 9 ऑगस्टला भाजपची साथ सोडली. पंतप्रधान म्हणून मोदींनाच पसंती - नरेंद्र मोदी हे आतापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, असं 44 टक्के लोकांचं मत आहे. त्याच वेळी 17 टक्के लोकांनी अटलबिहारी वाजपेयी, 13 टक्के इंदिरा गांधी आणि 8 टक्के लोकांनी मनमोहन सिंग यांना सर्वोत्तम पंतप्रधान मानलं. तर केवळ 5 टक्के लोकांनी जवाहरलाल नेहरूंना मतदान केलं. 53 टक्के जणांनी पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर 9 टक्के जणांना राहुल गांधी पुढचे पंतप्रधान वाटत आहेत. केजरीवालांना 6 टक्के, योगी आदित्यनाथ यांना 5 टक्के आणि अमित शाह यांना 3 टक्के जणांनी पसंती दिली आहे. शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये किती मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल? कोण सर्वात श्रीमंत? भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून लोक गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहत आहेत. या सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलं की भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण आहे?, या प्रश्नावर अमित शहा यांना 25 टक्के, योगी आदित्यनाथ यांना 24 टक्के, नितीन गडकरी यांना 15 टक्के मतं मिळाली आहेत. राजनाथ सिंह यांना 9 टक्के आणि निर्मला सीतारामन यांना 4 टक्के मतं मिळाली आहेत.