राजकोट 22 फेब्रुवारी : देशात सध्या हिजाब विरुद्ध भगवा असा वाद पेटला असताना राजकोट (Rajkot) इथल्या सोहिल हुसेन मोर (Sohil Husain Mor) या वकिलानं (Advocate) शिवजयंती दिनी (Shivajayanti) आपल्या हिंदूधर्मीय शेजाऱ्यांना चाकू दाखवत देशातून निघून जाण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. यामुळे तिथे तणाव निर्माण झाला असून, या वकिलाविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा, मारहाणीचा, तसंच पोलिसांना कर्तव्य बजावण्यात अडथळे आणल्याचा आरोप करत दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (20 फेब्रुवारी) सायंकाळी मुंजकाजवळच्या शामाप्रसाद मुखर्जी नगर आवास इथं ही घटना घडली. 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती. सोहिल हुसेन मोर यांनी आपल्या निवासी सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद टिप्पणी पोस्ट केली होती. त्यावर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या एक सदस्य ज्योती सोढा (Jyoti Sodha) यांनी मोर यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. तेव्हा संतापलेल्या मोर यांनी सोढा यांना सांगितलं, की ‘आता हा देश पाकिस्तान झाला आहे आणि तुम्ही सर्वांनी देश सोडावा.’ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या मार्ग मोकळा, 27 तारखेला घोषणेची शक्यता या संभाषणाचं ऑडिओ रेकॉर्डिंग News18Gujarati ने शेअर केले आहे. यामध्ये सोहिल हुसेन मोर हे ‘हा देश आता पाकिस्तान बनला आहे. इथले सगळे नागरिक मुस्लीम आहेत. सर्व हिंदूंनी निघून जावं,’ असं कोणालातरी रागारागाने सांगत असल्याचं ऐकू येतं. त्यावर त्या समोरच्या महिलेने ते असे का म्हणत आहेत, असं विचारल्यावर तो पुन्हा रागारागानं म्हणाला, की ‘हेच खरं आहे, आता तुम्ही निघून जा.’
किशन भारवाडच्या प्रकरणात पाकिस्तानचा सहभाग दिसून आला. तो म्हणाला, की या समाजाचं पाकिस्तानात रूपांतर होईल आणि सर्व हिंदूंनी इथून निघून जावं. किती काळ तुम्ही मला गप्प ठेवाल, माझ्या पाठीशी मोठं सैन्य आहे. रविवारी हर्षा नावाच्या कर्नाटकातल्या तरुणाने हिजाबविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मोर यानं त्याच्या व्हॉट्सअॅप डीपीवर ‘मी हिजाबला समर्थन देतो’ अशी एक प्रतिमादेखील पोस्ट केली असल्याचंही समोर आलं आहे. यानंतर सोढा यांनी मोर याची प्रत्यक्ष भेट घेतली आणि असे धार्मिक तेढ वाढवणारे, चिथावणीखोर शब्द वापरू नका असं सांगितलं. त्यावर मोर यानं सोढा यांना चाकू दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यानं आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि दारावर लावलेल्या तोरणातली गणपतीची मूर्तीही फोडली. त्यामुळं सोसायटीतल्या सदस्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलीस हवालदार रवत डांगर यांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला असता मोर यानं त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर रविवारी उशिरा कॉन्स्टेबल डांगर यांनी मोर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला. अखेर सोमवारी त्याला अटक करण्यात आली.
या घटनेनंतर माध्यमांनी सोसायटीतल्या रहिवाशांशी संपर्क साधल्यानंतर एका रहिवाशाने प्रसारमाध्यमांना सांगितलं की, असं विचित्र विधान अशिक्षित व्यक्तीनं नाही, तर पेशाने वकील असलेल्या व्यक्तीनं केलं आहे. हे धक्कादायक आहे. आतापर्यंत ही व्यक्ती आमच्याबरोबर मिळून मिसळून राहत होती; पण गेल्या काही काळापासून त्याच्या वागण्यात बदल झाला आहे. त्याच्या बोलण्यात कट्टरतावादी शब्द येऊ लागले असल्याचं आम्हाला जाणवलं होतं. त्याच्या अशा धार्मिक कट्टरतेचा पुरस्कार करणाऱ्या, इतरांबद्दल द्वेषाची भावना बाळगण्याच्या टोकाच्या विचारांमागे मोठं रॅकेट असू शकतं, अशी शंकाही एका प्रत्यक्षदर्शी सदस्यानं व्यक्त केली. एकंदर हिजाब विरुद्ध भगवा या वादाचं लोण आता वाढत चालल्याचं दिसत असून, आता नागरिकांनीच संयम बाळगून हा वाद शमवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दुफळीचा फायदा शत्रू घेऊ शकतील, अशी भावना व्यक्त होत आहे.