प्रेमात धोका मिळाल्यामुळे एका महिलेनं आपल्या प्रियकराला भयंकर शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (File Photo)
प्रतापगढ, 11 सप्टेंबर: प्रेमात धोका मिळाल्यामुळे एका महिलेनं आपल्या प्रियकराला भयंकर शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी प्रेयसीनं आपला भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीनं ऐन साखरपुड्याच्या दिवशीच प्रियकराची गळा चिरून हत्या (Killed boyfriend by slitting his throat) केली आहे. यानंतर आरोपी महिलेनं प्रियकराचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला होता. पण मृतदेह तरंगत बाहेर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा (FIR Lodged) दाखल केला असून आरोपी महिलेला अटक (Accused girlfriend arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील सांगीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरैनी गावातील आहे. मैरनी गावातील रहिवासी असणाऱ्या राजेंद्र वर्मा याचं मागील काही दिवसांपासून रामनगर भोजपूर येथील सोना देवी नावाच्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण काही दिवसांपूर्वी मृत राजेंद्र याचं लग्न ठरलं होतं. 31 ऑगस्ट रोजी साखरपुडाही होणार होता. पण आपल्या प्रियकराचं लग्न होतंय, यामुळे प्रेयसी सोना देवी राजेंद्रवर दु:खी झाली होती. प्रेमात धोका मिळाल्यानं आरोपी प्रेयसी सोना देवीनं आपला भाऊ आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीनं राजेंद्रच्या हत्येचा कट रचला. हेही वाचा- जिच्यावर प्रेम केलं तिलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं;थरारक घटनेनं चंद्रपूर हादरलं आरोपींनी 29 ऑगस्ट रोजी राजेंद्र याला लखनऊ येथून आपल्या चारचाकी गाडीत बसवलं होतं. सोना देवीचा भाऊ आणि त्याचे अन्य दोन मित्र या गाडीत आधीपासूनच बसले होते. गाडीत बसून काही अंतर जाईपर्यंत सर्व काही ठिक होतं. आपली हत्या होणार आहे, याचा जराही सुगावा राजेंद्रला लागला नव्हता. पण काही अंतर दूर गेल्यानंतर प्रेयसी सोना देवी, तिचा भाऊ आणि अन्य दोन साथीदारांनी राजेंद्रची गळा चिरून हत्या केली. हेही वाचा- वेडी ठरवत पतीनेच पत्नीला भोंदूबाबाच्या स्वाधीन केलं; घृणास्पद घटनेनं पुणे हादरलं त्यानंतर आरोपींनी एका नाल्यात राजेंद्रचा मृतदेह टाकून घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेच्या तीन दिवसांनी राजेंद्र याचा मृतदेह नाल्यात आढळला. याप्रकरणी तपास करत पोलिसांनी मुख्य सुत्रधार आरोपी प्रेयसी सोना देवीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरलेला चाकूही जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.